२५ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यास बंदी घालण्याची मागणी

सनातन संस्थेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी सांगितले की, केरळमध्ये लक्षावधी महिला आणि पुरुष भक्तांनी शबरीमला मंदिराच्या परंपरेच्या रक्षणार्थ मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने आदी सनदशीर माध्यमातून निषेध नोंदवला.

लासलगाव (जिल्हा नाशिक) : युवकांना व्यसनाच्या आहारी ढकलणार्‍या सनबर्न फेस्टीव्हलला हिंदुत्वनिष्ठांचा विरोध !

 पाश्चात्त्य चंगळवादाला खतपाणी घालणा-या, हिंदु संस्कृतीला घातक असणा-या आणि युवक-युवतींंनी व्यसनाच्या आहारी ढकलणा-या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला अन् हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या षड्यंत्राला येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला.

मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्माते दाखवतील का ? – डॉ. दिक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

लव्ह जिहाद चित्रपटसृष्टीत पहिल्यापासून आहेच. त्याचाच परिपाक असणारा केदारनाथ हा चित्रपट म्हणजे त्याची परिसीमाच म्हणावी लागेल. मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखवले असते का, असा प्रश्‍न सनातन संस्थेच्या डॉ. दिक्षा पेंडभाजे यांनी उपस्थित केला.

भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत ! – काशिनाथ प्रभु, सनातन संस्था

भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत.

१९७६ प्रमाणे पुन्हा घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’च्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ ही सुधारणा करायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिले, त्यात ‘सेक्युलर’ हा शब्द कुठेही नाही; मात्र १९७६ मध्ये या संविधानात ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडून आणीबाणीच्या काळात हिंदूंची घोर फसवणूक केली गेली.

जळगाव येथे हिंदू संघटन कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना ईश्वरी अधिष्ठान आवश्यक आहे; म्हणून प्रत्येक धर्मप्रेमीने कार्य करतांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीच्या उद्देशाने साधना करायला हवी.

दरभंगा (बिहार) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदु राष्ट्राविषयी संपर्क अभियान

आजचा दरभंगा जिल्हा पूर्वीच्या मिथिला प्रांतात येतो. या मिथिला राज्याला राजर्षी जनक यांची परंपरा आहे. ते प्रभु श्रीरामाची पत्नी सीतादेवी यांचे पिता होते. राजा जनक यांनी मिथिला नगरीवर सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग असे तीन युगे राज्य केले. जनक हे राजा असूनही त्यांंना ऋषीपद प्राप्त झाले.

धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्या भारतीय राज्यघटनेत नाही ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

वास्तविक घटनेत धर्मनिरपेक्ष शब्दाची व्याख्या अथवा अर्थ देण्यात आलेला नसल्याने त्याचे धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, लौकिकवाद आदी विविध अर्थ काढले जात आले आहेत.

स्वाभिमान निर्माण होण्यासाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’चे नाव त्वरित बदलावे. – गिरीष जोशी, सनातन संस्था

गुलामगिरीचे प्रतीक असलेले ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारतव्दार’ करावे. आज अनेक देशांमध्ये पारतंत्र्याच्या खुणा पुसल्या जातात; परंतु आपल्या देशात मात्र इंग्रजाळलेले राज्यकर्ते वर्षानुवर्षे त्याच खूणा जपून ठेवतात.

रत्नागिरी जिल्ह्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात शासनाला निवेदन

राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे, याचे स्मरण केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशीच बहुतांश भारतियांना होते.