चेन्नई येथे गुरुपौर्णिमेनिमित्त सनातनच्या वतीने विशेष सत्संग

चेन्नई अण्णानगर, येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सत्संग घेण्यात आला. श्री. बालाजी यांनी त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रातील मित्रांसाठी या सत्संगाचे त्यांच्या निवासस्थानी आयोजन केले होते.

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सनातनचा सहभाग

आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त ! श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय म्हणजे हिंदूंच्या भावनांशी खेळ ! ठाणे – मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले. प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. देवनिधी लुटणार्‍या पापी व्यक्तींना शिक्षा न देणार्‍या शासनाला श्री शनैश्‍चर देवस्थान कह्यात घेण्याचा कोणताही … Read more

सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी मुंबई येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिराचे आयोजन !

सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे अविभाज्य घटक आहेत. सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवांच्या अनुमतींपासून ते प्रत्यक्ष उत्सव साजरे करेपर्यंत अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते.

सोलापूर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘साधनावृद्धी शिबिरा’चे आयोजन

सौ. राजश्री तिवारी यांनी ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व’ हा विषय मांडला. शिबीर साडेचार घंटे होऊनही वाचक उठण्यास सिद्ध नव्हते.

खामगाव येथे महेश नवमीनिमित्त ‘धार्मिक कृतींमागील शास्त्र’ या प्रवचनाचे आयोजन !

१९ जून या दिवशी महेश नवमीनिमित्त येथील माहेश्‍वरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्येे सनातनच्या साधकांना ‘हिंदु धर्मातील विविध धार्मिक कृतींमागील शास्त्र आणि जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

कोल्हापूर येथे सनातन संस्थेच्या वतीने शिबिर पार पडले !

नामजप मनापासून केल्यानंतर ‘भक्ती’ वाढेल, असे मार्गदर्शन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी ३१ मे या दिवशी येथील कृष्णा सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या शिबिरात केली.

सनातन संस्थेच्या आध्यात्मिक क्षेत्रातील विशेष कार्याचा हिंदुत्वनिष्ठांना परिचय

६ जून या दिवशी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सनातन संस्थेच्या आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याविषयी एक विशेष सत्र झाले.

सोलापूर येथील नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला प्रारंभ

सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन सोलापूर येथील दत्त चौक, दत्त मंदिराच्या जवळ लावण्यात आले आहे. येथील भाजपचे नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून प्रदर्शनाला प्रारंभ करण्यात आला.

पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या धर्मरथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन सहकारनगर, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, कोथरूड, हडपसर, सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, शिरवळ (जिल्हा सातारा) येथे लावण्यात आले. त्याला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

एर्नाकुलम् (केरळ) जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद !

‘१ ते ११.३.२०१८ या कालावधीत एर्नाकुलम् जिल्ह्यातील मरिन ड्राइव्ह येथे आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा (इंटरनॅशनल बुक फेअर) आयोजित केला होता. सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनात अध्यात्म, देवतांची उपासना, पालकांसाठी, तसेच बालसंस्कार आदी विषयांवरील ग्रंथ होते. याला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.