साधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

खर्ची आणि जळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने साधना विषयावर प्रवचन !

खर्ची येथे मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – आज दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक मनुष्याची धडपड ही आनंद मिळावा म्हणून असते. हा आनंद केवळ साधना करूनच मिळू शकतो. साधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते; म्हणून प्रत्येक मनुष्याने साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे सदगुरु नंदकुमार जाधव यांनी केले. खर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील प्रवचनात ते बोलत होते. या वेळी त्यांनी साधनेतील विविध विषयांवर उपस्थित जिज्ञासूंना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. याचा लाभ खर्चीमधील ५५ जिज्ञासूंनी घेतला. जळगावमधील शिवाजीनगर येथेही २२ ऑगस्ट या दिवशी साधना शिबिर झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment