सनातन संस्थेतर्फे तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधन

नवे-पारगाव-वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) – तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी ‘गणेशोत्सव आदर्श आणि वास्तव’ याविषयी प्रबोधन करण्यात आले. सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी हे प्रबोधन केले. याचा लाभ ११० विद्यार्थ्यांनी घेतला. श्री गणेशमूर्ती विसर्जन आदर्शरित्या कसे करावे, याविषयीची ध्वनीचित्र-चकतीही दाखवण्यात आली. या वेळी महाविद्यालयातील दोन प्राध्यापक उपस्थित होते. ‘विषय ऐकून पुष्कळ उपयुक्त माहिती मिळाली’, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment