संभाजीनगर आणि जालना येथे सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर पार पडले

संभाजीनगर आणि अंबड – संभाजीनगर येथील बजाजनगर येथील गणपति मंदिरात महिलांसाठी आणि शिवमंदिरात पुरुषांसाठी, तसेच अंबड (जिल्हा जालना) येथे सर्वांसाठी नुकतेच सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिर घेण्यात आले. या वेळी सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी गुरुकृपायोगानुसार करावयाचे साधनेचे महत्त्व आणि त्यातील टप्पे उपस्थित जिज्ञासूंना समजावून सांगितले. गुरुकृपायोगाचे आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने असलेले महत्त्व, साधना, मनुष्यजन्माचे महत्त्व, कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप कसा करावा ? यांविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. धर्मशिक्षणाविषयीही त्यांनी सांगितले.

आपल्यातील आणि कुटुंबातील चैतन्यशक्ती जागृत करण्यासाठी चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरात जाऊन सर्वांनी नामजप करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला मनःशांती मिळते आणि तरुण पिढी संस्कारित होते, असेही सद्गुरु जाधव यांनी सांगितलेे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment