सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य

साहाय्य करतांना सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
अब्दुल्लाट येथील पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप केल्यावर एकत्रित पूरग्रस्त आणि हिंदुत्वनिष्ठ
वैद्यकीय शिबिरात पूरग्रस्तांची तपासणी करतांना डॉ. आशुतोष विभुते

कोल्हापूर – उचगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने शिरोळ तालुक्यातील लाटवाडी, अब्दुल्लाट येथे आणि हुपरी येथील १ सहस्र पूरग्रस्तांना भोजन, बिस्कीट पुडे, पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. यात शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, शिवसेनेचे श्री. विक्रम चौगुले, श्री. चंद्रकांत वळकुंजे, श्री. सतीश भोसले, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी सहभागी झाले होते.

भडगाव येथे पूरग्रस्तांची तपासणी करतांना आधुनिक वैद्या सुषमा अथणी

गडहिंग्लज – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. ही तपासणी आधुनिक वैद्या सुषमा अथणी यांनी केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुनंदा पाटील आणि सौ. राजश्री चोथे उपस्थित होत्या. या सेवाकार्यात एम्.पी.डब्लू. च्या सरकारी कर्मचार्‍यांनी साहाय्य केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment