पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्थेचा सहभाग

कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) – मुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य, कपडे, संसारोपयोगी आणि शैक्षणिक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. याचसमवेत अंगणवाडीतील १०० बालकांना कपडे आणि खाऊ यांचे वाटप करण्यात आले. या सेवाकार्यात सनातन संस्थेचाही सक्रीय सहभाग होता.

याचा शुभारंभ जिल्हा न्यायाधीश श्री. महेश लंबे, सनातन संस्थेचे श्री. परेश वैती, सामाजिक कार्यकर्ते श्री. स्नेहल काळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमात हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य उमेश लंबे, सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या मेघा लंबे यांच्यासह मुंबई येथील निकिता गवस, सर्वश्री रमेश वाशिकर, निखिल विश्‍वासराव, प्रसाद गवस, तेजस काळे यांचा सहभाग होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment