यावल (जळगाव) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना’ शिबिर

शिबिरास उपस्थित जिज्ञासू आणि मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव

जळगाव – येथील विठ्ठल मंदिरात धर्मप्रेमींसाठी २१ ऑगस्ट या दिवशी ‘साधना’ शिबिर घेण्यात आले. ‘कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, काळानुसार ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजपाची आवश्यकता, तसेच साधना करतांना विविध अडचणींवर मात कशी करावी ?, स्वभावदोष दूर करून ईश्‍वराची प्राप्ती कशी करायची ?’ आदींविषयी सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी शिबिरातील उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी ९० धर्मप्रेमी उपस्थित होते. शिबिरानंतर अनेकांनी ‘साधनेचे महत्त्व लक्षात आले’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment