महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन !

महाशिवरात्री निमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन व्याख्याने आदी माध्यमांतून व्यापक स्तरावर धर्म आणि अध्यात्म प्रसार करण्यात आला.

‘पंचमहाभूत लोकोत्सवा’त सनातन संस्थेचा कक्ष !

या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे ४०० हून अधिक प्रदर्शन कक्ष !

सनातनच्या या ग्रंथप्रदर्शनाला विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पहार्‍यासाठी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली.

महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शन स्थळी मान्यवरांच्या भेटी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे (उजवीकडे) यांनी पेण येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘नटराज वंदना’ विशेषांक भेट देण्यात आला.

पुणे येथे सनातन संस्थेकडून श्री गजानन महाराज प्रकटदिन निमित्त ग्रंथ प्रदर्शन !

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त १३ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांचे प्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेने जिल्ह्यात अनेक शिवमंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी खारीचा नाही, तर हनुमंताप्रमाणे वाटा उचला ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

कोल्हापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनीही मार्गदर्शन केले.या सभेस ४ सहस्र ५०० हून अधिक हिंदू उपस्थित होते.

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनात सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

या प्रदर्शनामध्‍ये शास्‍त्रोक्‍त भाषेत लिहिलेले अध्‍यात्‍म, राष्‍ट्र आणि धर्म, आयुर्वेद, धर्माचरण इत्‍यादी विषयांवरील ग्रंथ ठेवण्‍यात आले होते. तसेच मराठी भाषेवरील अद्वितीय ग्रंथही या प्रदर्शनात उपलब्‍ध होते.

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

‘भक्‍त घडेल’, असा मंदिर व्‍यवस्‍थापनाचा अभ्‍यासक्रम असायला हवा ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

जळगाव येथे पार पडलेल्‍या महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषदेमध्‍ये ‘मंदिराचे सुप्रबंधन (सुव्‍यवस्‍थापन)’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्‍यात आला होता. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील विविध भागांतील मंदिरांचे विश्‍वस्‍त, तसेच सनातन संस्‍थेचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. चेतन राजहंस सहभागी झाले होते.