दत्त जयंती निमित्त केलेल्या प्रसारात धर्मशिक्षणवर्गातील कृतीशील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

दत्त जयंती निमित्त पुणे जिल्ह्यात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींच्या माध्यमातून ‘दत्त जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व’ या विषयावर ऑनलाईन प्रवचन घेण्यात आले. प्रवचनांच्या प्रसारसेवेत धर्मशिक्षणवर्गात नियमित येणारे भोर, नाशिक रस्ता आणि माळवाडी येथील धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

गीता जयंतीनिमित्त हरियाणा सरकारच्या वतीने आयोजित ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’मध्ये सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्थेच्या वतीने ‘भगवद्गीता’ या विषयावर सनातनच्या साधिकेने मार्गदर्शन केले. या वेळी हरियाणा सरकारच्या वतीने सनातन संस्थेचा भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

२५ डिसेंबरला नाताळऐवजी तुळशीपूजन करणे, म्हणजे सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणे होय ! – सदगुरु नंदकुमार जाधव

भारतीय संस्कृती तुळशीला देवता म्हणून पूजते. त्यामुळे २५ डिसेंबर या दिवशी असलेल्या तुळशीपूजन दिनानिमित्त येथे हिंदु राष्ट्र सेना आणि योग वेदांत सेवा समिती, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तुळशीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात अध्यात्मप्रसार !

दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे, यासाठी ‘ऑनलाईन’ व्याख्याने, सामूहिक नामजप, फलकप्रसिद्धी, सोशल मिडीया आदी माध्यमांतून ठाणे जिल्ह्यात लोकांचे प्रबोधन करण्यात आले

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सातत्याने आनंदी रहाता येणे शक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपण करत असलेल्या नामजपादी साधनेसमवेत आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलनही अत्यावश्यक आहे. आपल्या दोषांमुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण नियमितपणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास आपल्याला सातत्याने आनंदी रहाणे शक्य आहे.

भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे. भारतमातेला वाचवायचे असल्यास हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

सत्सेवेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या कार्यात जिज्ञासूंनी स्वत:चा सहभाग वाढवावा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

२० आणि २१ नोव्हेंबर या दिवशी चिंचवड (पुणे) आणि सोलापूर जिल्ह्यातील ‘साधना सत्संगा’मध्ये नियमित सहभागी होणार्‍या जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. या सोहळ्याला ३५० हून अधिक जिज्ञासू ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.

सत्संग आणि सेवा यांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन राष्ट्र-धर्माचे कार्य करायला हवे ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कळंबोली येथील युवा साधक-प्रशिक्षण शिबिरात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची वंदनीय उपास्थिती लाभली.

‘सीबर्ड ट्रान्सपोर्ट’च्या कर्मचार्‍यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर शिबिर

खरा आनंद भगवंताच्या नामजपात आहे. आपण आध्यात्मिक आणि लौकिक प्रगतीसाठी स्वतःच्या कुलदेवतेचा नामजप करावा. स्वतःचे कार्य प्रामाणिकपणे केले, तर भगवंताची कृपा प्राप्त होऊन व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवनात यश मिळते.

महाराष्ट्रात वसुबारसेनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या गोपूजनाच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सहभाग !

दीपावलीच्या काळातील ‘वसुबारस’ या सणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी गोवत्सपूजन करण्यात आले. गोपूजनाचा वृत्तांत येथे देत आहोत.