सनातन संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वहात्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन

दादर चौपाटी आणि मुलुंड येथील कृत्रिम तलावाजवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानिमित्त धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यासंबंधी जनप्रबोधन मोहीम राबवण्यात आली.

श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये ! – सोलापूर येथे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी

श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये, तसेच मूर्तीदान ही संकल्पना राबवू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देण्यात आले.

ठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सनातनचा सहभाग

आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांकडून संताप व्यक्त ! श्री शनैश्‍चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय म्हणजे हिंदूंच्या भावनांशी खेळ ! ठाणे – मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले. प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. देवनिधी लुटणार्‍या पापी व्यक्तींना शिक्षा न देणार्‍या शासनाला श्री शनैश्‍चर देवस्थान कह्यात घेण्याचा कोणताही … Read more

सार्वजनिक उत्सव आदर्शरित्या साजरे व्हावेत, यासाठी मुंबई येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिराचे आयोजन !

सार्वजनिक उत्सव आणि सण हे हिंदु धर्माचे अविभाज्य घटक आहेत. सार्वजनिक उत्सव मंडळांना उत्सवांच्या अनुमतींपासून ते प्रत्यक्ष उत्सव साजरे करेपर्यंत अनेक ताणतणावांना सामोरे जावे लागते.

धुळे, मुंबई आणि पुणे येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्य आणि चैतन्य यांचा आविष्कार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत २० मे या दिवशी धुळे, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

बोईसर आणि कोपरखैरणे येथे मंदिरांची स्वच्छता !

बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्‍वस्तांनी मंदिरात साकडे घालण्यासाठी अनुमती दिली. कोपरखैरणे येथील श्री चिकानेश्‍वर शिव मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली.

जळकोट (जिल्हा नांदेड) येथे सनातन संस्थेकडून भागवत सप्ताहात मार्गदर्शन

जळकोट – येथील सनातन संस्थेचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते, तसेच जळकोट पंचायत समितीचे बांधकाम सभापती श्री. रमाकांत रायवार यांनी आयोजिलेल्या भागवत सप्ताहात सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते.

भारतीय संविधानात ‘सेक्युलर’ या शब्दाची कुठलीही व्याख्या नाही ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

प्रत्यक्षात ‘सेक्युलर’ या शब्दाची कोणतीही व्याख्या किंवा अर्थ भारतीय संविधानात दिलेला नाही. त्यामुळे ‘सेक्युलर’ शब्दाचे ‘धर्मनिरपेक्षता’, ‘सर्वधर्मसमभाव’, ‘लौकिकवाद’ असे विविध प्रकारचे अर्थ आज अनेकांनी काढले आहेत.

जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विचार यांपासून रक्षण करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

आज हिंदू पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘नारीशक्ती’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात केले.