हिंदु धर्मजागृती सभेत सनातन संस्थेचे श्री. संजय कुमार सिंह यांचे धर्माचरणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन

लोहता (वाराणसी) येथे पार पडली हिंदु धर्मजागृती सभा

सौ. प्राची जुवेकर आणि श्री. संजय कुमार सिंह

वाराणसी (उत्तरप्रदेश) – देश आणि धर्म यांच्यासाठी सर्वांनी त्याग करण्याची सिद्धता करायला हवी. त्या त्यागातून हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. प्राची जुवेकर यांनी केले. येथील लोहता भागातील हनुमान मंदिर येथे २८ जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर त्या उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करत होत्या. या वेळी सनातन संस्थेचे श्री. संजय कुमार सिंह यांनीही धर्माचरणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. येथील स्थानिक धर्माभिमानी श्री. दीपक गुप्ता यांनी सभेचे आयोजन करण्यामध्ये साहाय्य केले, तसेच पुढेही विविध कार्याच्या आयोजनाची सिद्धता दर्शवली.

२. डिसेंबर २०१७ मध्ये वाराणसी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनातून अधिवक्ता अरुण मौर्य यांनी प्रेरणा घेऊन वरील धर्म जागृतीसभेचे आयोजन केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment