जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

नाशिकमध्ये मातृ-पितृ दिनाच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग

नाशिक – पूज्यपाद श्री आसारामजी बापू आश्रमाच्या वतीने १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करता गोदावरीच्या किनारी रामकुंड परिसरात मातृ-पितृ दिवस साजरा करण्यात आला. यात पाल्यांनी त्यांच्या माता-पित्यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. पूज्यपाद श्री आसारामजी बापू आश्रमाचे श्री. रामभाई यांनी या कार्यक्रमाचा उद्देश आणि मातृ-पितृ दिवसाचे महत्त्व सांगितले. या वेळी सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. या वेळी भाजपचे पदाधिकारी पाटील, श्री. काकाजी, बजरंग दलाचे श्री. विनोद थोरात, श्री चंदन भास्करे, श्री. प्रवीण जाधव आणि श्री आसारामजी बापू यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

योग वेदान्त सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ दिन’ साजरा

जळगाव – श्री योग वेदान्त सेवा समिती च्या वतीने त्यांच्या आश्रमात १४ फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला. या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्‍वरमहाराज जळकेकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर उपस्थित होत्या.

शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘जळगाव मातोश्री आनंद आश्रमा’चे आणि ‘सिंधी समाज वृद्धाश्रमा’चे आई-बाबा यांचे आणि गुरुजनांचे पूजन करून मातृ-पितृ दिन नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा केला.

ह.भ.प. जळकेकर महाराज यांनी ‘आई’ची महती सांगितली, तर समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर या वेळी म्हणाल्या, ‘‘आजची तरुण पिढी पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या आचरणाने व्यभिचाराकडे वळत असून महान अशा भारतीय संस्कृतीपासून दूर जात आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी धर्माचरणाची आवश्यकता आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment