पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विचार यांपासून रक्षण करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

मुंबई – सध्या भारतात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. धर्मांधांकडून लव्ह जिहादसारखे षड्यंत्र रचून हिंदूंना संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला केवळ तरुण मुलीच नाही, तर महिलाही बळी पडत आहेत. आज हिंदू पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी धारावी येथील वज्रदलाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘नारीशक्ती’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात केले. ५५ जणांनी याचा लाभ घेतला.

 

प्रवचनानंतर महिलांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया !

प्रवचनानंतर उपस्थित महिला म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत आम्ही व्रतवैकल्य कर्मकांड या पद्धतीने साधना करत होतो. जीवनात प्रथमच आम्हाला शास्त्रशुद्ध नमस्कार कसा करावा, ते समजले. आम्ही धर्मशिक्षणवर्गाला जाण्याचे टाळत होतो. आता आम्ही धर्मशिक्षणवर्गाला जाऊ.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment