पुणे, मिरज येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत सनातन संस्था सहभागी !

मिरज येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या पारंपरिक वेशातील महिला

मिरज, १२ एप्रिल (वार्ता.) – ‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत हिंदु एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विहिंप, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, धर्मप्रेमी, भाविक आणि सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते.

मिरज येथे काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सहभागी झालेल्या पारंपरिक वेशातील महिला

या शोभायात्रेचा प्रारंभ मैदान दत्त मंदिर येथून होऊन श्रीकांत चौक, सराफ कट्टा, गणेश तलाव या मार्गाने गर्डर विठ्ठल मंदिर येथे यात्रेची सांगता झाली. या शोभायात्रेत हलगी, भगव्या ध्वजासह पारंपरिक गुढी, भगवे झेंडे, वाजंत्री, झांजपथक, चंद्ररथ आणि त्यामध्ये श्रीरामाची भव्य भूर्ती, हिंदु साम्राज्यदिन रथ, पालखी यांचा समावेश होता. यात्रेतील भगवे ध्वज आणि सर्व हिंदुत्वनिष्ठांनी भगवी टोपी परिधान केली होती, तर महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि भगवी वस्त्रे परिधान केली होती.

चंद्ररथात ठेवण्यात आलेली श्रीरामाची सुंदर मूर्ती
छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि राष्ट्रपुरुष यांच्या वेशात सहभागी झालेले बालगोपाळ

बालगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराज, मावळे आणि राष्ट्रपुरुष यांचा वेश परिधान केला होता. मैदान दत्त मंदिरासमोर भव्य आणि सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. शोभायात्रेतील मान्यवरांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यात्रा चालू असतांना भजनही करण्यात आले. ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हिंदु धर्म की जय’, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

पुणे येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने रा.स्व. संघाच्या वतीने आयोजित शोभायात्रा उत्साहात पार पडली !

रा.स्व. संघाच्या शोभायात्रेत सहभागी सनातन संस्थेचे साधक

पुणे, १३ एप्रिल (वार्ता.) – येथे नागरिकांनी ठिकठिकाणी नववर्षाचे शोभायात्रेद्वारे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले. याशिवाय अनेक संघटना, संस्था यांनी सार्वजनिक गुढीही उभारली. याचप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनेही ९ एप्रिलला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चौकाचौकांत रांगोळ्या काढून नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत केले. या शोभायात्रेत सनातन संस्थेचे साधक हातात फलक घेवून सहभागी झाले होते. यामध्ये वारजे शाखेचे संघाचे प्रमुख श्री. स्वप्निल भेंडे यांनी सनातन संस्था शोभायात्रेत सहभागी झाल्याने संस्थेचे विशेष कौतुक केले. या शोभायात्रेत विश्व मांगल्य, तेजस्विनी लेझीम पथक, गोकुळनगर पठार येथील २ आणि वारजे माळवाडी येथील १ भजनी मंडळ/ वारकरी दिंडी सहभागी झाले होते. या शोभायात्रेचा आरंभ ज्ञानेश्वरी उद्यान, वारजे येथून झाला आणि पॉप्युलरनगर, वारजे दत्त मंदिर येथे सांगता समारोह झाला.

शिवकालीन शस्त्र विद्येची प्रात्यक्षिके !

या वेळी मुळशी तालुक्यातील श्री. कुंडलिक कचले यांच्या प्रसिद्ध शौर्य पथकाकडून शिवकालीन शस्त्र विद्येची प्रात्यक्षिके (लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा, भाला इत्यादी) सादर करण्यात आली.

Leave a Comment