सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्या ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

वर्धा येथे ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान !

मार्गदर्शन करतांना श्री. चेतन राजहंस

वर्धा, १९ ऑक्टोबर (वार्ता.) – सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, कम्युनिस्ट, जिहादी आणि  तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी एकत्र कार्यरत आहेत. ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया यांच्यासारखा आहे आणि तो संपला पाहिजे’, अशी वक्तव्ये स्टॅलिनसारखे हिंदुद्वेष्टे नेते करू लागले आहेत. हिंदु धर्मप्रेमींनी या शक्तींच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियानाच्या अंतर्गत येथील मार्गदर्शनात ते बोलत होते. या कार्यक्रमाला सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती होती.

Leave a Comment