‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

सांगली – श्रद्धा वालकरच्या प्रकरणानंतरही अनेक ठिकाणी हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडल्याच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चाद्वारे हिंदूंनी याविरोधात रोष व्यक्त करूनही अशा घटना थांबवण्यास सिद्ध नाहीत. धर्माचरण आणि साधना हेच समस्येसाठी मूळ उत्तर असल्याने ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना रोखण्यासाठी युवतींनी धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. सांगली येथील शिंदे मळा येथे धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी आयोजित मार्गदर्शनात त्या बोलत होत्या. या प्रसंगी सद्गुरु स्वाती खाडये यांनी धर्माचरण, तसेच जीवनातील साधनेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले.

Leave a Comment