हिंदु धर्मशास्त्रात सांगितलेले प्रार्थनेचे महत्त्व परकियांना अलीकडे उमगणे !

हिंदु धर्मशास्त्रात सहस्रो वर्षांपूर्वीच सांगितलेले प्रार्थनेचे महत्त्व परकियांना अलीकडे उमगणे !

प्रार्थना : ईश्‍वराशी अनुसंधान साधण्याचा सुलभ मार्ग

साधना करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते. प्रार्थनेमुळे व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतात.

प्रार्थना का करावी ?

प्रार्थनेने देवता वा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो, चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते आणि अशक्य गोष्टही शक्य होते.