भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- भारतियांचे निसर्गाशी असलेले स्नेहसंबंध !

आमच्या ऋषीमुनींनी निसर्गाच्या सान्निध्यात अनेक वर्षे साधना करून निसर्गाशी जवळीक साधली. त्यांनी निसर्गाच्या सहवासात जीवन व्यतीत करून निसर्गाशी एकरूप होऊन नैसर्गिक शक्तींची अनेक गूढ रहस्ये उकलून विश्‍वापुढे ज्ञानाचे नवे दालन उघडले.

कन्यागत महापर्वकाल !

कन्यागत म्हणजे कन्या राशीमध्ये गेलेला. गुरु ग्रहाने कन्या राशीतून तूळ राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा गंगा कुंड पुढील ११ वर्षे कोरडे रहाते. १२ वर्षांनंतर गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर पुन्हा गंगा कुंडातून जलप्रवाह चालू होतो. या वेळी गंगा नदी कृष्णा आणि वेण्णा या नद्यांना भेटायला येते.

निस्सीम सेवेने भगवान दत्तात्रयांचे दर्शन झालेले संत एकनाथ महाराज !

गुरुकृपेने भगवंताची भेट होते, हे समजल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी (आकाशवाणीच्या निर्देशानुसार) नाथ देवगिरी (दौलताबाद) येथे पोचले. तेथे दत्तभक्त जनार्दनस्वामी किल्लेदार म्हणून होते. नाथांनी त्यांना पाहिले आणि त्यांना सद्गुरु मानून त्यांची मनोभावे सेवा केली.

स्वस्तिक हे चिन्ह ११ सहस्र वर्षे प्राचीन ! – संशोधकांचा निष्कर्ष

स्वस्तिक हे चिन्ह किमान ११ सहस्र वर्षे जुने आहे. हे चिन्ह आर्य संस्कृतीच्या आणि सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून अस्तित्वात होते.

सर्वश्रेष्ठ राष्ट्र निर्माण करणारी वैदिक शिक्षणपद्धत !

पूर्वीच्या काळी वैदिक शिक्षणपद्धत होती. त्यामुळे भारत सर्वश्रेष्ठ असे राष्ट्र होते. ते इतके समृद्ध होते की, त्या वेळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जाते. या वैदिक शिक्षण पद्धतीचा पाया आध्यात्मिक होता. तसेच हे वैदिक शिक्षण कालातीत आणि हितकारी असल्यामुळेच त्या शिक्षणप्रणालीतून सिद्ध झालेले विद्यार्थी राष्ट्राला उच्च स्थानावर नेऊन पोचवत होते.

गुरुकुल शिक्षणपद्धती

आजवर आपण अनेकदा भारतातील प्राचीन गुरुकुल पद्धतीविषयी ऐकले असेल. या शिक्षण पद्धतीत गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेणे, एवढाच अर्थ आपणांस ठाऊक असतो. गुरुकुल म्हणजे नेमके काय, तेथील दिनचर्या, अध्यापन पद्धती काय असते, आदी माहिती होण्यासाठी उदाहरणादाखल एका गुरुकुल पद्धतीची माहिती येथे देत आहोत.

आनंददायी शिक्षणपद्धत कशी असावी ?

  वर्तमानात अभ्यास करून मुले खरेच आनंदी होत आहेत का ? शाळा चालू होऊन एक महिनाच होत आहे. तरीही शाळेच्या धकाधकीच्या वेळापत्रकामुळे मुले त्रस्त झालेली असतात. ‘कधी एकदा शाळा सुटते’, असे त्यांना सततच वाटत असते. परीक्षांच्या काळातही पाठ्यपुस्तकांतील सारखे तेच तेच परिच्छेद वाचून ती अतिशय कंटाळून जातात. ‘परीक्षा संपल्या की, कुठेतरी मस्तपैकी जाऊन मजा करून यायला … Read more

मुलांसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक आहे का ?

मुलांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक ! पूर्वीच्या काळी गुरुकुलात मुलांना प्रथम अध्यात्मशिक्षण आणि नंतर ६४ कलांपैकी २ – ३ कलांचे शिक्षण दिले जायचे. अहंभाव वाढण्याआधीच मुलांना अध्यात्माचे शिक्षण दिल्यास त्यांच्यावर सात्त्विक संस्कार होऊन आध्यात्मिक उन्नती होते.

समर्थ रामदासस्वामींना त्यांच्या आजारावरील उपाय म्हणून वाघिणीचे दूध आणून देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

शिवाजीराजे प्रत्येक गुरुवारी समर्थांचे दर्शन घेतल्याविना भोजन करत नसत. एके दिवशी राजे समर्थांच्या दर्शनार्थ निघाले असता महाबळेश्‍वरच्या रानात समर्थ असल्याचे त्यांना समजले. समर्थ दर्शनार्थ कितीही कष्ट पडले, तरी त्याची खंत ते मानत नसत.

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज

सनातन संस्था कशी स्थापन झाली ?… वर्ष १९९१ मध्ये एकदा डॉ. सौ. कुंदाताईंचा मला फोन आला, ‘बाबा (प.पू. भक्तराज महाराज) नाशिकला आले आहेत.