स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अंदमानमधील कार्य !

स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमधून सुटले, त्याला २ मे २०२१ या दिवशी १०० वर्षे झाली. बाबाराव आणि तात्याराव सावरकर हे दोघे बंधू ३ सहस्र ५८६ दिवसांनंतर २ मे १९२१ या दिवशी अंदमानातून सुटले. याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानमध्ये केलेले कार्य, कवी सुधाकरपंत देशपांडे यांनी केलेली कविता आणि अन्य सूत्रे येथे देत आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दूरदृष्टीचे सैनिकी धोरण !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीसच्या ऐतिहासिक उडीचे हे १०६ वे वर्ष ! देशाला जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी पदोपदी स्वत:च्या प्राणांची बाजी लावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे नररत्नच.

विचारक्रांती आणि आचारक्रांती घडवणारे हिंदु राष्ट्राचे उद्गाते वीर सावरकर !

‘सावरकरांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ।’ या काव्यातून सागराला उद्देशून त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. ते म्हणतात, ‘‘हे सागरा, मी अशा संकटात सापडलो आहे की, आता मी परत माझ्या मातृभूमीला परत जाईन किंवा नाही’, असे वाटते.

प्रतिकूल परिस्थितीत मन वज्रशाली करण्यासाठी गीतेचे साहाय्य घेणारे सावरकर

सावरकरांना लंडनमध्ये पकडून बोटीने भारतात आणले जात होते. फ्रान्सच्या मार्सेलिसहून त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते पकडले गेले. त्यांना बोटीवर खोलीत कोंडले. मुसलमान पहारेकरी नेमले. आता आपला अमानुष छळ होणार, हे जाणून मनाला वज्रशाली करण्याकरिता त्यांना गीता आठवली.

माझे मृत्यूपत्र

‘मार्च १९१० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर विलायतेत पकडले गेले, तेव्हा त्यांनी या जन्मात जिची भेट होणे जवळ जवळ असंभवनीय होते, अशा त्यांच्या स्वत:च्या वहिनीस लंडनमधील ब्रिक्सन कारागृहातून या जन्मातील त्यांचा बहुधा शेवटचा निरोप देणारे हे मृत्यूपत्र लिहून धाडले होते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेच्या स्थापनेचा जाज्वल्य इतिहास !

आपण पारतंत्र्यात आहोत, याचे सावरकरांना विलक्षण दुःख होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी आपण पराकाष्ठेचे प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांना वाटायचे.

मायभूमीच्या रक्षणासाठी सागरालाही कवेत घेऊ पहाणार्‍या सावरकरांची जगप्रसिद्ध उडी !

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांनी लंडनमध्ये अटक केली. पुढील अभियोग (खटला) हिंदुस्थानातील न्यायालयात चालवण्यासाठी त्यांना मोरिया या आगनौकेवर आरक्षकांच्या (पोलिसांच्या) पहार्‍यात चढवण्यात आले. तेव्हा…

अंदमानातील स्वा. सावरकरांच्या स्मृती जागृत करणारी छायाचित्रे

समोरच्या बाजूने अंदमान येथील सेल्युलर कारागृह कारागृहात सावरकरांना ठेवलेली खोली सावरकर कोठडी क्रांतीकारकांनी अशा प्रकारे यांतना सोसल्या कैद्यांना शिक्षा म्हणून ओढावा लागणारा कारागृहातील कोलू कारागृहाचा आतील भाग अंदमान हे समस्त देशभक्तांचे स्फूर्तीस्थान ! स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेच्या मुक्ततेसाठी अनेक मरणप्राय यातना सोसल्या, ती हीच भूमी ! त्यामुळेच अंदमानाच्या या सेल्युलर कारागृहाकडे पाहिल्यानंतरही … Read more

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आत्मार्पण : मृत्यूंजय जीवनावरील सुवर्णकळस !

आज फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी (१४ मार्च २०१६) म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा तिथीनुसार स्मृतीदिन (आत्मार्पण) !