जन्मकुंडली, हस्तसामुद्रिक आणि पदसामुद्रिक यांतील भेद

टीप १

‘प्रश्‍नकुंडली’ म्हणजे ज्योतिषाला प्रश्‍न विचारण्याच्या वेळी व्यक्तीच्या असलेल्या ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार मांडण्यात आलेली कुंडली.

 

टीप २

कर्माचा संबंध हातरूपी कर्मेंद्रियाशी अधिक प्रमाणात असून
पायांशी अल्प प्रमाणात निगडित असल्यामुळे पायांच्या रेषांवरून भविष्य
वर्तवण्याचे प्रमाण हाताच्या रेषांवरून भविष्य वर्तवण्याच्या प्रमाणापेक्षा अल्प असणे

‘हात आणि पाय यांवरील रेषांचा संबंध पूर्वजन्मातील कर्माशी असल्यामुळे त्यांना ‘कर्मरेषा’ असे संबोधले जाते. क्रियमाण कर्म केल्यामुळे कर्मरेषांमध्ये सूक्ष्म-पालट होऊन कालांतराने हे सूक्ष्म-पालट दृश्य स्वरूपात स्थुलातून दिसू लागतात. त्यामुळे व्यक्तीचा तळवा आणि तळपाय यांवरील रेषांमध्ये विविध प्रकारचे पालट झाल्याचे आढळून येते. कर्माचा संबंध हातरूपी कर्मेंद्रियाशी अधिक प्रमाणात असून पायांशी अल्प प्रमाणात निगडित आहे. त्यामुळे कर्माच्या परिणामस्वरूप हाताच्या तुलनेत पायाच्या रेषांमध्ये अल्प प्रमाणात पालट होत असल्यामुळे पायांच्या रेषांवरून भविष्य वर्तवण्याचे प्रमाण हाताच्या रेषांहून अल्प आहे.’

– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.