भारताचा स्वाभिमान राष्ट्रसंहारक बाबर कि राष्ट्रोद्धारक राम ?

भारतातील देशद्रोही नेते भारतवर्षाचा आदर्श, गाय, स्त्री आणि असाहाय्य प्रजेचा पालनहार अन् राष्ट्रोद्धारक मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाचा पदोपदी अवमान करतात, तर गोभक्षक, स्त्रियांना पळवणारा कामुक, लुटारू, राष्ट्रसंहारक आणि मंदिर भंजक विदेशी आक्रमक बाबरचा उदोउदो करतात. अशा या बाबराच्या क्रूर मानसिकतेची काही उदाहरणे पुढील लेखात पाहूया. म्हणजे बाबर समर्थकांचे खरे स्वरूप सर्वांच्या लक्षात येईल.

 

१. पूर्वजांचे अवगुण अंगभूतच असलेला बाबर !

गोहत्यारा बाबराचा जन्म उझबेस्तान येथील फरगना प्रदेशातील अंधीजान गावात झाला. त्याच्या आईचे नाव कुतलक बेगम आणि वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा होते. बाबर याच्या स्वभावातील दुष्टपणा, निष्ठुरता आणि मूर्खपणा, हे त्याच्या आईचे पूर्वज क्रूर चंगेजखां अन् वडिलांचे पूर्वज निर्दयी तैमूरलंग यांच्याकडून आले होते. तो मूळचा मंगोलियन होता; परंतु नंतर त्याच्या वंशाने पर्शियन धर्म स्वीकारला.

 

२. हिंदूंच्या सामूहिक हत्येने प्रफुल्लित होणारी बाबराची क्रूर मुसलमानी वृत्ती !

बाबरने स्वतःच्या जीवनचरित्रात लिहिले आहे, ‘मुसलमान धर्म न स्वीकारणार्‍या नीच काफिर हिंदूंचा वध करणे, हेच माझे मुख्य ध्येय आहे. मी कुराणच्या ९ ः ५ या आयतेला अनुसरून त्यांना शोधून-शोधून मारत इस्लामचा हुतात्मा बनू इच्छित होतो; परंतु खुदाची इच्छा मी धर्मयोद्धा (गाज़ी) बनलो.’ ‘तुजके बाबरी’ या बाबरच्या इतिहासात म्हटले आहे, ‘बाबर हिंदूंंच्या सामूहिक कत्तलीच्या वेळी मैदानात उंच सिंहासनावर बसून अत्यंत प्रफुल्लित होऊन या भयावह दृश्यास पहात असे.’

 

३. वास्तव सांगणारे श्री नानकदेवजी यांना बंदी बनवणे

हिंदूंचे गुरु श्री नानकदेवजी यांनी मोगल आक्रमक बाबर याला जात आणि देश यांचा क्रूर मारेकरी संबोधून त्याची निंदा केली होती. त्यामुळे बाबराने त्यांंना कारावासात टाकले.

 

४. हुमायूनचा (बाबरचा मुलगा) हिंदुद्वेष्टेपणा !

अ. बाबराच्या ९ बायका होत्या. त्यांच्यापासून त्याला ४ मुले आणि २ मुली झाल्या. बाबरचा मुलगा हुमायूनला पुष्कळ दयाळू समजले जाते. प्रत्यक्षात ‘सैयद अहमद’ लिखित ‘अथारूप सनादाद’ मधील नोंदीनुसार हुमायूं यानेच जहानाबाद नगरच्या उत्तरपूर्व घाटावर सम्राट युधिष्ठिराने निर्माण केलेल्या यज्ञशाळा तोडून त्या जागेवर ‘निळी छत्री’ ही मशीद उभारली.

आ. याच क्रूर नराधमाने चितोडवर आक्रमण करणार्‍या नवाब सुलतान बहादूर याचे ‘काफिरांशी केल्या जाणार्‍या युद्धात आम्ही तुमच्या वाटेत येणार नाही’, असे सांगून समर्थन केले होते.

इ. पुढे हुमायूनचा मुलगा अकबरानेही १० सहस्र निःशस्त्र हिंदूंची कत्तल केली होती.’

(‘मासिक सावरकर टाइम्स’, एप्रिल २०११)