थोर गणेशभक्त मोरया गोसावी आणि गाणपत्य संप्रदाय

‘गाणपत्य’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संप्रदायामध्ये श्री गणपतीला परब्रह्म, परमात्मा कल्पिले असून त्यापासून इतर देवदेवतांची उत्पत्ती झाली आहे, अशी श्रद्धा आहे.

‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर यांनी केले आहे.

साधक आणि भक्त यांच्यासाठी प्रासादिक ठेवा असलेली प.पू. भक्तराज महाराज यांची चैतन्यमय भजने अन् त्यांचे भावार्थ !

चला जाऊ नाथ सदनाला । साई सदनाला ।
सर्व सौख्याचा लाभ होईल आपणाला ।।

होती ऐसी, नाही झाली संत मुक्ताबाई !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या बहीण संत मुक्ताबाई यांनी जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद (आताचे मुक्ताईनगर) येथे समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरादि चार भावंडांत संत मुक्ताबाई आपल्या वैशिष्ट्याने प्रसिद्ध आहेत. चौदाशे वर्षे जिवंत राहून गर्व करणाऱ्या योगेश्वर चांगदेवांच्या त्या गुरु होत्या.

गोवा ही परशुरामभूमीच !

वैतरणा नदी ते कन्याकुमारी या भारताच्या पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्याच्या भागाला ‘परशुराम क्षेत्र’ असे म्हटले जाते. भगवान परशुरामांविषयीचा उल्लेख स्कंद पुराण, रामायण, महाभारत आदी ग्रंथांमध्ये आढळून येतो. या ग्रंथांमध्ये परशुरामांनी समुद्राला मागे हटवून जमिनीचा काही भाग देण्याची आज्ञा केली, असा उल्लेख आढळतो.

बसलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि सनातन-निर्मित उभ्या असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र यांच्या संदर्भातील प्रयोग

सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या चित्रात ती उभी दाखवली आहे. अनेकदा हितचिंतक आणि साधक या चित्राच्या संदर्भात पुढील सूत्र सुचवतात, श्री लक्ष्मीदेवी उभी न दाखवता ती बसलेली हवी.

आदर्श व्यक्तीमत्त्व श्रीरामभक्त हनुमान !

सध्या ‘व्यक्तीमत्त्व विकास’ हा अगदी शाळकरी मुलांमध्येही प्रचंड आवडीचा विषय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्यक्तीमत्त्व विकासासाठी सहस्रो रुपयांचे वर्ग लावण्यापेक्षा हनुमंताचे चरित्र वाचले, तरीही आपल्याला बरेच काही शिकायला मिळेल. तसेच व्यक्तीमत्त्व कसे असावे, याचे उत्तम उदाहरण श्रीरामचंद्र आणि हनुमंत यांच्या कार्यातून आपल्याला पहायला मिळेल. त्यासाठी हा लेखनप्रपंच !

प्रभु श्रीरामांचा जन्म होण्यामागे अनेक उद्देश असणे !

‘रामचरितमानसनुसार, ‘हरिचा अवतार ज्या कारणामुळे होतो, ते तेवढेच एक कारण आहे’, असे म्हणता येत नाही.’ श्रीहरिच्या रामावतारामध्ये अशी ज्ञात आणि अज्ञात अनेक कारणे आहेत, जी विविध कल्पे-युग यांमध्ये प्रभु श्रीराम यांचा जन्म होण्यासाठी सुनिश्चित केली जातात.