यज्ञयागामुळे मनुष्य आणि वातावरण यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो ! – संशोधनातील निष्कर्ष
यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. या संदर्भात गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची धर्मशाळा या दोन ठिकाणी २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने यज्ञाच्या परिणामांचे परीक्षण करण्यात आले.