शूरांचे दैवत स्कंद म्हणजेच खंडोबा आणि चंपाषष्ठी
महाराष्ट्रातील कित्येक घराण्यांचे कुलदैवत खंडोबा हे आहे. क्षत्रिय बाण्याचा देव म्हणून मराठ्यांना हा विशेष प्रिय वाटतो. ‘जयाद्रि माहात्म्य’ यात या खंडोबादेवाचे महत्त्व वर्णन केले आहे. रामोशी, धनगर जातीचे लोक हेही खंडोबाची उपासना करतात. प्राणीवर्गांत कुत्र्याच्या रूपात खंडोबा वास करतो, अशी समज आहे.
