बसलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि सनातन-निर्मित उभ्या असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे चित्र यांच्या संदर्भातील प्रयोग

सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीच्या चित्रात ती उभी दाखवली आहे. अनेकदा हितचिंतक आणि साधक या चित्राच्या संदर्भात पुढील सूत्र सुचवतात, श्री लक्ष्मीदेवी उभी न दाखवता ती बसलेली हवी. यामागे सांगणार्‍यांचा विचार असा असतो की, बसलेली लक्ष्मीदेवी पूजल्यास घरातली लक्ष्मी (संपत्ती) घरात स्थिरावते. ती उभी असल्यास आर्थिक स्थिती वर-खाली होण्याची शक्यता असते. या संदर्भात एक प्रयोग करूया.

 

प्रयोग

अ आणि आ या चित्रांकडे प्रत्येकी २ मिनिटे पाहून काय वाटते ? ते अनुभवा.

साधकांनो, तत्त्वनिष्ठ राहून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे
देवतांंचे रूप स्वीकारल्यास त्याचा अधिक लाभ होतो, हे लक्षात घ्या !

१. प्रयोगाचे उत्तर

बसलेल्या श्री लक्ष्मीदेवीच्या चित्रापेक्षा उभ्या श्री लक्ष्मीदेवीच्या चित्राकडे पाहून अधिक चैतन्य जाणवते आणि तिच्याशी आंतरिक जवळीक वाटते.

१ अ. विश्‍लेषण

देवी या देवतांच्या कार्यरत शक्ती असतात. त्यानुसार श्री लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची कार्यरत शक्ती आहे. बसलेल्या रूपापेक्षा देवीचे उभे रूप हे कार्यरततेला अधिक पूरक आहे. भक्तांच्या उद्धारासाठी सतत कार्यरत असलेल्या शक्तीच्या या रूपाकडे पाहून आंतरिक जवळीक वाटते आणि भावजागृती होते.

२. सनातन-निर्मित देवीचे उभे चित्र
पुजल्याने साधकांना विविध आध्यात्मिक अनुभूती येणे

येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, सनातन-निर्मित देवीच्या उभ्या चित्राचे आज अनेक साधक भक्तीभावाने घरी पूजन करत आहेत. त्यांना वरील शंकेप्रमाणे कोणताच कटू अनुभव आलेला नाही. याउलट त्यांच्या साधनेला देवीचे चित्र पूरक ठरून त्यांना विविध आध्यात्मिक अनुभूतीही येतात.

३. साधकांनी तत्त्वनिष्ठ राहून शास्त्रानुसार देवतांचे रूप स्वीकारणे आवश्यक

काही साधक विचार करतात की, देवतेला उभे कसे ठेवायचे ? यासाठी ते देवतांची बसलेली रूपेच पूजतात.

वरील विचार हा भावनिक आहे. साधकांनी तत्त्वनिष्ठ राहून आपल्याला जे वाटते, त्यापेक्षा शास्त्रात काय सांगितले आहे ? त्यानुसार देवतांचे रूप स्वीकारल्यास त्या रूपातून अधिक लाभ होतो.

– सौ. जान्हवी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०१४)

Leave a Comment