माघी श्री गणेश जयंती (Ganesh Jayanti 2024)

Article also available in :

माघी श्री गणेश जयंती का साजरी करतात ?

श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे, या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. 


माघी श्री गणेश जयंतीचे महत्त्व

गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्त लाभ होतो. 


माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी हे करा !

 • श्री गणेशाचा नामजप दिवसभर करा.
 • श्री गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करा.
 • श्री गणेशाला लाल फुले आणि दूर्वा वाहा.
 • सायंकाळी श्री गणेश स्तोत्राचे पठण करा.
 • घरात श्री गणेशाची सात्त्विक नामजप पट्टी लावा.

श्री गणेशाचा नामजप करा !

देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप. भक्‍तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे.  देवतेचा नामजप भावपूर्ण झाला, तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करतांना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन केला, तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते. श्री गणेशाचा नामजप कसा करावा, हे आपण येथे ऐकूया.

अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनने श्री  गणेशाची नामजप पट्टी बनवली आहे. ही नामजप पट्टी घरात लावल्याने घरात सात्विकता निर्माण होते आणि आपल्याला नामजप करण्याची आठवणही होते.


श्री गणेशाची स्तोत्रे म्हणा !

‘स्तोत्र’ याविषयी थोडे समजून घेऊया. ‘स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्‍तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षक-कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्‍तींपासून रक्षण होते. श्री गणेशाची दोन स्तोत्रे सर्वपरिचित आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘संकष्टनाशन स्तोत्र’. ‘गणपति अथर्वशीर्ष’ हे श्री गणेशाचे दुसरे सर्वपरिचित स्तोत्र आहे. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते, त्या वेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्‍ती निर्माण होते. याकरता स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे. 

सण-उत्सव आणि साधना यांविषयी जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सत्संगात सहभागी व्हा !

श्री गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेश तत्त्व जास्त प्रमाणात असल्यामुळे साधना करणाऱ्यांना विविध प्रकारच्या अनुभूती येतात. विविध सण कसे साजरे करावे, साधना कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आमच्या विनामूल्य ऑनलाईन सत्संगांमध्ये सहभागी व्हा !


माघी श्री गणेश जयंतीला गणपतीची पूजा कशी करावी ?

श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी पुढील प्रार्थना कराव्यात.

अ. हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्याप्रती भक्तीभाव निर्माण होऊ दे.

आ. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण करता येऊ दे.

श्री गणेशाला गंध कोणत्या बोटाने लावावे ?अनामिकेने (करंगळीच्या जवळचे बोट)
फुले कोणती वाहावीत ?लाल जास्वंद / लाल रंगाची अन्य फुले
कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ?चंदन / केवडा / चमेली
उदबत्त्यांची संख्या किती असावीदोन
अत्तर कोणत्या गंधाचे अर्पण करावे ?हीना
श्री गणेशाला प्रदक्षिणा किती घालाव्यात ?आठ किंवा आठच्या पटीत
श्री गणेशाला पूजेमध्ये गंध, हळद-कुंकू, लाल फुले, दूर्वा वाहातात. त्याची पद्धत आणि लाभ खाली दिले आहेत.

श्री गणेशाला गंध, हळद-कुंकू कसे वहावे ?

पूजा करतांना श्री गणेशाला उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. श्री गणेशाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वहावे. अंगठा आणि अनामिका जोडून निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे भक्‍तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

श्री गणेशाला कोणती फुले वहावीत ?

विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. श्री गणेशाला तांबड्या जास्वंदाची फुले वहावीत. या फुलांकडे गणेश-तत्त्व अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत आणि विशिष्ट आकारात वाहिल्यास त्या फुलांकडे देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार श्री गणेशाला फुले वहातांना ती ८ किंवा ८ च्या पटीत आणि शंकरपाळ्याच्या आकारात वहावीत. शंकरपाळ्याच्या आकारात फुले वहातांना ‘दोन लहान कोन एका सरळ रेषेत देवतेच्या समोर येतील आणि मोठे दोन कोन दोन बाजूंना दोन रहातील’, अशा पद्धतीने फुले वहावीत. जास्वंद वा अन्य लाल फूल वहातांना ‘देठ श्री गणेशाच्या चरणांकडे व तुरा आपल्याकडे येईल’, असे वाहावे.

जास्वंदीच्या फुलाचे वैशिष्ट्य दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

श्री गणेशाला दूर्वा का वहातात ?

दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक प्रमाणात असते; म्हणून श्री गणेशाला दूर्वा वाहाव्यात. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व मूर्तीत येते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला अधिक लाभ होतो. श्री गणेशाला दूर्वा नेहमी विषम संख्येने (न्यूनतम ३ किंवा ५, ७, २१ इत्यादी) वाहाव्यात. श्री गणेशाला वहायच्या दूर्वा नेहमी कोवळ्या असाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. समिधा एकत्र बांधतो, तशा दूर्वा एकत्र बांधाव्यात. एकत्रित बांधल्याने त्यांचा गंध बराच काळ टिकतो. या गंधामुळे गणेशतत्त्व मूर्तीकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होते आणि टिकूनही रहाते. यासाठी दूर्वा अधिक वेळ टवटवीत रहाव्यात; म्हणून पाण्यात भिजवून मग वाहाव्यात. दूर्वा वहातांना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा. त्यामुळे श्री गणेशाचे तत्त्व आपल्याकडे प्रक्षेपित व्हायला साहाय्य होते.

दूर्वांचे वैशिष्ट्य दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

श्री गणेशाची आरती

श्री गणेशाची पूजा झाल्यावर ‘सुखकर्ता दुःखहर्ता…’ ही आरती म्हणावी. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.  ‘सनातन’च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्‍वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल. तर ऐकूया, सात्त्विक पद्धतीने गायलेली श्री गणेशाची आरती …

श्री गणेश संबंधित सनातन-निर्मित उत्पादने
SanatanShop.com

श्री गणेश संबधित माहिती जाणून घ्या !

गणपतीची उपासना कशी करावी, त्या संदर्भातील धार्मिक कृती कशा कराव्यात, त्यांचे महत्त्व आणि लाभ’ यांविषयीची माहिती दिली आहे. श्री गणेशाची तीर्थक्षेत्रे, अष्टविनायक दर्शन, गणेशाची अन्य व्रते आणि ती करण्याची आदर्श पद्धत आदी वैशिष्ट्यपूर्ण माहिती उपलब्ध आहे.

गणेश पूजा आणि आरती अ‍ॅप

संकेतस्थळ

सनातन संस्थेच्या संकेतस्थळा‍‍वरील ऑडिओ गॅलरी मध्ये संत रचित स्तोत्रे, संतांच्या मार्गदर्शनाखाली योग्य गती व उच्चारांनुसार म्हटलेले देवतांचे नामजप, तसेच भावपूर्ण गायलेल्या विविध देवतांच्या आरत्या इत्यादी उपलब्ध आहे. याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या !

स्तोत्रदेवतांचे नामजप
श्री गणेश अथर्वशीर्षश्रीराम
श्रीरामरक्षास्तोत्रश्रीकृष्ण
मारुतिस्तोत्रश्री गणेश
श्रीकृष्णाष्टकश्री दुर्गादेवी
अगस्त्योक्त-आदित्यहृदयदत्तात्रेय
श्री सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रशिव
Audio Gallery

सनातन संस्थेच्या संकेतस्थळा‍‍वरील ऑडिओ गॅलरी मध्ये सात्त्विक पुरोहितांनी म्हटलेले स्तोत्र, संतांनी स्वतः म्हटलेले देवतांचे नामजप तसेच भावपूर्ण लयीत साधकांनी गायिलेल्या विविध देवतांच्या आरत्यांसह वर्षभरात येणार्‍या विविध सणांच्या वेळी तथा प्रतिदिन म्हणायच्या विविध श्‍लोकांचा समावेशही या लिंकवर करण्यात आला आहे.

स्तोत्रदेवतांचे नामजप
श्री गणेश अथर्वशीर्षश्रीराम
श्रीरामरक्षास्तोत्रश्रीकृष्ण
मारुतिस्तोत्रश्री गणेश
श्रीकृष्णाष्टकश्री दुर्गादेवी
अगस्त्योक्त-आदित्यहृदयदत्तात्रेय
श्री सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्रशिव

श्री गणेशाची जन्मकथा आणि कार्यारंभी त्याचे पूजन करण्यामागील शास्त्र सांगणारा व्हिडीओ !

6 thoughts on “माघी श्री गणेश जयंती (Ganesh Jayanti 2024)”

 1. चतुर्थी दिवशी चुकून चंद्रदर्शन केल्यास प्रायश्चित काय घ्यावे ?

  Reply
  • नमस्कार वरदजी,

   आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. श्री गणेश चतुर्थी या दिवशी चुकून चंद्रदर्शन झाल्यास काय करावे, याविषयी जाणून घेण्यास भेट द्या – https://www.sanatan.org/mr/a/763.html

   आपली,
   सनातन संस्था

   Reply
  • नमस्कार,

   गणेश जयंती (माघ शुद्ध चतुर्थी) या दिवशी श्री गणेशतत्त्व प्रथम पृथ्वीवर अवतरले म्हणजे श्री गणपतीचा जन्म झाला तो दिवस.

   श्री गणेश चतुर्थीच्या कालावधीत (भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी) गणेशतत्त्व वातावरणात अधिक प्रमाणात कार्यरत असते म्हणून त्या कालावधीत ते ग्रहण करण्यासाठी गणपतीची उपासना करतात.

   Reply
 2. फुले शंकरपाळ्याच्या आकारात वाहावीत म्हणजे कसे ?

  Reply
  • नमस्कार शशिकलाजी,

   शंकरपाळ्याचा आकार म्हणजे या आकारात –

   Reply

Leave a Comment