गोस्वामी तुलसीदास यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू !

गोस्वामी तुलसीदास (जन्म : वर्ष १५११, देहत्याग : वर्ष १६२३) हे उत्तरप्रदेशातील महान संत होऊन गेले. त्यांना महर्षि वाल्मिकी ऋषि यांचा अवतार मानले जाते. ते रामचरितमानस, अयोध्याकांड, सुंदरकांड इत्यादी महान आध्यात्मिक ग्रंथांचे रचयिते आहेत.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात्मक स्मृती (भाग २) !

सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प.पू. भक्तराज महाराज हे गुरु होत. त्यांच्याच कृपाशीर्वादाने सनातनची स्थापना झाली. सनातनला प.पू. बाबांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचेही कृपाछत्र लाभले. त्यांच्या आशीर्वादाने वर्ष १९९१ मध्ये स्थापन झालेल्या सनातनच्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सनातन परिवार प.पू. बाबांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे !

समर्थ रामदासस्वामी यांचे आज्ञापालन करतांना जिवाचीही तमा न बाळगणारा त्यांचा शिष्य कल्याण !

गुरूंचे आज्ञापालन केल्याने अनेक शिष्यांची प्रगती झाली, त्यांतीलच एक होते कल्याणस्वामी ! त्यांचे मूळचे नाव अंबाजी. एकदा समर्थ रामदास स्वामींनी अंबाजीला एका विहिरीवर आलेली झाडाची फांदी तोडण्यास सांगितले.

स्वामी विवेकानंद यांच्यासारखा जाज्ज्वल्य धर्माभिमान स्वत:मध्ये बाणवा !

स्वामीजी त्यांच्या शिष्यांसह काश्मीरला गेले होते. तेथे क्षीर भवानीच्या मंदिराचे भग्न अवशेष त्यांनी पाहिले. अत्यंत विषण्ण होऊन स्वामीजींनी स्वत:च्या मनाला विचारले, जेव्हा हे मंदिर भ्रष्ट आणि भग्न केले जात होते, तेव्हा लोकांनी प्राणपणाने प्रतिकार कसा केला नाही ?

बाजीप्रभु देशपांडे : दुर्दम्य स्वराज्यनिष्ठेचा आदर्श

स्वराज्याविषयीचा अभिमान आजही आपल्या रोमरोमात भिनवणार्‍या बाजीप्रभूंचा पराक्रम त्यांच्या राष्ट्र आणि धर्मनिष्ठेचे दर्शन घडवते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी आत्मबलिदान दिलेल्या अशा बाजीप्रभु आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभु देशपांडे या पराक्रमी लढवय्यांच्या बलीदानदिनानिमित्त सदर लेख प्रकाशित करत आहोत.

‘संगीत आणि नृत्य या कलांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती’ करण्यासाठी उडुपी (कर्नाटक) येथील स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी केलेले मार्गदर्शन !

‘स्वामी विनायकानंदजी महाराज यांनी लहान वयातच साधना करण्याचा निश्‍चय केला. ते लहानपणी बेंगळुरु येथील श्रीरामकृष्ण मठात साधनारत होते.

देवी महाकालीच्या आशीर्वादाने संस्कृतमध्ये अतुलनीय काव्यरचना करणारे महाकवी कालिदास !

कालिदास हे प्राचीन भारतातील एक संस्कृत नाटककार आणि कवी होते. ‘मेघदूत’, ‘रघुवंशम्’, ‘कुमारसंभवम्’ आदि संस्कृत महाकाव्यांचा कर्ता म्हणून ते सुपरिचित आहेत.

प.प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्येस्वामी) यांच्या गरुडेश्‍वर (जिल्हा नर्मदा, गुजरात) येथील समाधी मंदिराचे छायाचित्रात्मक दर्शन

प.प. श्री. टेंब्येस्वामी महाराज हे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत ! प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभुच त्यांच्या रूपाने अवतरले आणि त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली आणि चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा अन् अधिष्ठान प्राप्त करून दिले.

भगवान शिवाला स्मरून चैतन्यशक्तीच्या बळावर कार्य करणार्‍या अहिल्याबाई होळकर !

अहिल्याबाई होळकर भगवान शिवाच्या भक्त होत्या. त्या प्रतिदिन शिवाची पूजा करत. शिवाच्या उपासनेतून त्यांनी स्वतःमध्ये चैतन्य निर्माण केले होते. त्या चैतन्यशक्तीच्या द्वारेच त्यांनी राज्यकारभाराची धुरा समर्थपणे सांभाळली.

चैतन्यस्फूर्तीने लढणार्‍या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृती जपणारी छायाचित्रे

झाशी, उत्तरप्रदेश येथील हा किल्ला राजा वीरसिंह जुदेव बुंदेलाने वर्ष १६१३ मध्ये बांधला. राजा बुंदेलच्या राज्याची ही राजधानी होती. हा किल्ला १५ एकर जागेत बांधला आहे.