गोस्वामी तुलसीदास यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू !

गोस्वामी तुलसीदास (जन्म : वर्ष १५११, देहत्याग : वर्ष १६२३) हे उत्तरप्रदेशातील महान संत होऊन गेले. त्यांना महर्षि वाल्मिकी ऋषि यांचा अवतार मानले जाते. ते रामचरितमानस, अयोध्याकांड, सुंदरकांड इत्यादी महान आध्यात्मिक ग्रंथांचे रचयिते आहेत. त्यांचा आध्यात्मिक अधिकार सिद्ध करणारा एक प्रसंग पाहूया.

उत्तरप्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर या गोस्वामी तुलसीदास यांच्या गावी त्यांच्या देहत्यागानंतर त्यांनी भक्तांना दृष्टांत देऊन कालिंदी (यमुना) नदीत मी मूर्ती रूपात आहे. मला घेऊन जाऊन मंदिरात ठेवून पूजा करा, असे सांगितले. त्यानुसार भक्तांनी मूर्ती शोधायला आरंभ केला. आठवडा उलटूनही मूर्ती सापडत नव्हती. त्या वेळी तुलसीदास यांनी भक्तांना पुन्हा दृष्टांत देऊन सांगितले की, ज्या ठिकाणी पाण्यात बुडबुडे येत असतील, त्या ठिकाणी मी आहे. त्यानंतर त्यांच्या घरापासून जवळच असलेल्या प्रभू घाटावर नदीत ही मूर्ती सापडली. वर दाखवलेली त्यांच्या जन्मखोलीत ठेवलेली हीच ती स्वयंभू मूर्ती !

संत तुलसीदास यांनी स्थापन केलेली राजापूर, चित्रकूट येथील संकटमोचन हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती
गोस्वामी तुलसीदास यांच्या पादुका ! त्यांचे भावपूर्ण दर्शन घेऊन आपले जीवन कृतार्थ करूया !
संत तुलसीदास यांनी स्वत: पूजलेला शाळीग्राम ! त्यांच्या शिष्यांचे वंशज आजही त्याची नित्यनेमाने, भावपूर्ण पूजा करतात.
अयोध्याकांड या तुलसीदास लिखित ग्रंथातील त्यांचे हस्ताक्षर असलेले पान ! त्यातील चैतन्य ग्रहण होण्यासाठी प्रार्थना करूया !
शिष्य तुलसीदास यांनी त्यांचे गुरु नरहरीदास यांची उत्कट गुरुसेवा केली ते राजापूर, उत्तरप्रदेश येथील नरहरीदास यांचे पवित्र महल मंदिर
राजापूर, चित्रकूट येथील ४०० वर्षांहून अधिक प्राचीन असलेला हा पिंपळाचा वृक्ष स्वत: गोस्वामी तुलसीदास यांनी लावला आहे.