सनातनच्या कार्यास माझे आशीर्वाद ! – श्री महास्वामीजी
चेंबूर येथील श्री. हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्ण जन्मजयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला.
चेंबूर येथील श्री. हरिहरपुत्र भजन समाज मंदिरात ३ ते ११ डिसेंबर या कालावधीत श्री महास्वामीजींचा सुवर्ण जन्मजयंती महोत्सव भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला.
गोव्यातील फोंड्याजवळ असलेल्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येकाने एकदा अवश्य जा. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे तेथे साक्षात दर्शन घडते.
हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि श्री. सतीश सोनार यांनी नुकतीच ज्येष्ठ प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना प.पू. डॉ. आठवले यांचा छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ भेट दिला.
सांगली बत्तीस शिराळा येथील श्री गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पू. पारसनाथजी महाराज, तसेच वाळवा तालुक्यातील मौजे जक्राईवाडी येथील श्री त्रिशुलभारती गुरु जीवनभारती महाराज यांची सनातन संस्थेचे साधक श्री. शंकर नरुटे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. भरत जैन यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
“सनातन समाजाला वेदांतातील तत्त्वांनुसार जीवन जगायला शिकवत आहे. आश्रमातील साधकांमध्ये ही तत्त्वे रुजली आहेत, हे जाणवत आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी याच प्रतिकृतीचे (‘मॉडेल’चे) रोपण आता समाजात विविध ठिकाणी केले की झाले.’’
परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे श्रीकृष्णाचे अवतार आहेत. तेच ईश्वरी राज्याची स्थापना करणार आहेत. त्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून सनातनचे साधक श्रीकृष्णाचे चित्र सप्तचक्रांवर उपायांसाठी लावतात, असे उद्गार कर्नाटक येथील शक्तीदर्शन योगाश्रमाचे प.पू. देवबाबा यांनी काढले.
सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो. या कार्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक पैलूंनुसार हिंदू जोडले जावोत, असे शुभाशीर्वाद प.पू. स्वामिनी मंगलानंदा यांनी दिले.
सनातन संस्थेचे कार्य, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील स्वच्छता आणि आदरभाव बघून हिंदुत्वनिष्ठ मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया
माझ्या मागील २ वर्षांच्या अनुभवावरून आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि चैतन्यदायी वातावरण आहे, जे उत्तरोत्तर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. माझ्या आध्यात्मिक चेतनेच्या आधारावरून येथे ब्रह्मांडातील ऊर्जा स्थलांतरित होत असल्याचे जाणवते, जी काळानुरूप भविष्यामध्ये अधिक वाढेल.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास भेट दिलेल्या धर्माभिमान्यांनी आश्रम दर्शनानंतर दिलेले अभिप्राय – १. ‘देवाच्याच घरी आले आहे’, असे वाटून ‘आश्रमातच रहावे’, असे वाटणे – सौ. शीला पटवा, बोनगाई गाव, आसाम…
