कल्याण येथील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

डावीकडून सौ. हेमा पवार, कु. परितोष पवार आणि आमदार श्री. नरेंद्र पवार यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना श्री. चेतन राजहंस

रामनाथी (गोवा)  – कल्याण (प.) येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव श्री. नरेंद्र पवार यांनी ३० डिसेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. हेमा पवार आणि त्यांचा मुलगा कु. परितोष हे उपस्थित होते. या वेळी त्यांना सनातनचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी आश्रमामध्ये चालणारे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. या वेळी आमदार श्री. पवार म्हणाले, ‘‘हिंदु धर्माचे मोठे कार्य या आश्रमातून होत असून हिंदूंसाठी प्रेरणादायी आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment