समाजात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी अनुभवलेले प्रेम !

श्री. सुधाकर चपळगावकर

‘सहा वर्षांपूर्वी माझ्या पोटावर एक मोठे शस्त्रकर्म झाले. नियमित तपासण्या चालू झाल्या. अशाच एका तपासणीत रक्तामध्ये अनावश्यक पेशींचे प्रमाण काहीसे वाढल्याचे दिसून आल्यामुळे मी पुण्याच्या एका प्रसिद्ध ज्येष्ठ पोटविकार तज्ञांची (Entrologist) भेट घेतली. त्यांनी मला काही इंजेक्शन्स घेण्यास सांगितली. त्याचा मला त्वरित गुण आला. पुढे पाच वर्षांनी मला त्यांची भेट घ्यावीशी वाटली. ताज्या तपासण्यांचे कागद घेऊन मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. कागदपत्रे पाहून आणि मला तपासून त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आता पूर्णतः आजारमुक्त झाला आहात.’’

औपचारिकरित्या मी त्यांचे आभार मानले आणि परमेश्‍वराकडे कृतज्ञता व्यक्त केली. बराच उशीर झालेला असल्यामुळे बाहेर कुणीही रुग्ण नव्हता. ‘मुले काय करतात ?’ इत्यादी विचारपूस झाल्यानंतर ‘तुम्ही आता काय करता ?’, असे त्यांनी मला मोठ्या प्रेमाने विचारले. ‘उच्च न्यायालयात फारसे काम करत नसलो, तरी मी सनातन संस्थेची न्यायालयीन आणि शासकीय कार्यालयीन कामे पहातो’, असे मी त्यांना सांगितले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांविषयी आम्ही काही वेळ एकमेकांशी बोललो. निघतांना मी नम्रपणे त्यांना त्यांची व्यावसायिक फी देऊ केली. ‘तुमच्याकडून नको’, असे त्यांनी मला तितक्याच नम्रपणे सांगितले.

प्रसारमाध्यमांतून संस्था आणि समिती यांबद्दल काही जरी येत असले, तरी ‘जनमानसात अन् त्यातही अभिजन समाजात संस्था अन् समिती यांबद्दल किती प्रेम आहे’, याचा मला प्रत्यय आला.

– श्री. सुधाकर चपळगावकर, निवृत्त जिल्हा न्यायाधीश, संभाजीनगर (३१.१२.२०१७)

Leave a Comment