रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात एकदा अवश्य जा, पुन्हा जावेसे वाटेल, असा भगवंत तेथे आहे ! – बाळासाहेब बडवे, पत्रकार आणि संपादक दैनिक पंढरी संचार

नामदेवांचे भक्त ह.भ.प. प्रकाश निकते गुरुजी यांनी संपादित
केलेल्या संत नामदेव अभंग चिंतनिका या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा

बाळासाहेब बडवे

पंढरपूर : गोव्यातील फोंड्याजवळ असलेल्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात प्रत्येकाने एकदा अवश्य जा. तेथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आहेत. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे तेथे साक्षात दर्शन घडते. एकदा तेथे जाल; तर प्रति तीन मासानंतर जावेसे वाटेल, असा भगवंत तेथे आहे, असे गौरवौद्गार दैनिक पंढरी संचारचे पत्रकार आणि संपादक श्री. बाळासाहेब बडवे यांनी काढले. येथील शासकीय वसाहत श्री गणेश मंदिर ट्रस्ट येथे ह.भ.प. प्रकाश निकते गुरुजी यांनी संपादित केलेल्या संत नामदेव अभंग चिंतनिका या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला, त्या वेळी ते बोलत होते.

या ग्रंथाचे प्रकाशन ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपिठावर माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात, ह.भ.प. बाळशास्त्री हरिदास आदी उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

प्रतिकूलतेला प्रतिकूलता न समजता जे पालटतात तेच खरे संत, हे ह.भ.प. प्रकाश निकते गुरूजींच्या कार्याकडे पाहिल्यावर जाणवते, असे प्रतिपादन ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांनी या वेळी केले. त्यानंतर सुधाकरपंत परिचारक यांनी संतांच्या सहवासाने माणूस घडतो. मी नेहमी संतांच्या सहवासात असतो. संत-सज्जनांच्या सहवासाचे महत्त्व स्पष्ट करून वाचाल, तर वाचाल आणि वाचण्यासाठी संत नामदेव अभंग चिंतनिका आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात