माझी हिंदुत्वाविषयीची भूमिका आणि सनातन संस्थेचे ध्येयधोरण एकच ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ भेट दिल्यावर भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी व्यक्त केला सनातन संस्थेविषयी जिव्हाळा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ग्रंथ दाखवतांना भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे, समवेत डॉ. उदय धुरी

मुंबई – अनेक वर्षांपासून परमपूज्य डॉ. आठवले यांच्या कुटुंबाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. वर्ष १९८५ मध्ये मी आयोजित केलेल्या बद्रीनाथ-केदारनाथ या यात्रेत प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अत्यंत जिज्ञासू वृत्तीने माझ्या शेजारी बसून अध्यात्मविषयीचे प्रश्‍नांवर चर्चा केली. मी नियमितपणे संपूर्ण दैनिक सनातन प्रभात वाचतो. माझी हिंदुत्वाविषयीची भूमिका आणि सनातनचे ध्येय-धोरण एकच आहे, असा सनातन संस्थेविषयीचा जिव्हाळा ज्येष्ठ प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांनी व्यक्त केला.

हिंदु जनजागृती समितीचे मुंबईचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी आणि श्री. सतीश सोनार यांनी नुकतीच ज्येष्ठ प्रवचनकार भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांची त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना प.पू. डॉ. आठवले यांचा छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ भेट दिला. या वेळी समितीचे कार्यकर्ते घरी आल्याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Comment