सनातन संस्था आणि हिदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथील पू. पारसनाथजी महाराज आणि श्री त्रिशुलभारतीगुरुजीवनभारती महाराज यांची सदिच्छा भेट

सांगली  – बत्तीस शिराळा येथील श्री गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पू. पारसनाथजी महाराज, तसेच वाळवा तालुक्यातील मौजे जक्राईवाडी येथील श्री त्रिशुलभारती गुरु जीवनभारती महाराज यांची सनातन संस्थेचे ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक श्री. शंकर नरुटे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. भरत जैन यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी त्यांना वर्ष २०१८ चे ‘सनातन पंचांग’ भेट देण्यात आले. श्री त्रिशुलभारती गुरु जीवनभारती महाराज यांच्या मठात या वर्षी श्री गणपति आणि श्री दत्तगुरु यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मठात प्रत्येक अमावस्येला, तसेच प्रतिदिनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. प्रत्येक वर्षी १५ एप्रिलला येथे मोठी यात्रा भरते.

 

सध्याची हिंदूंची स्थिती दयनीय आहे ! – पू. पारसनाथजी महाराज

या वेळी पू. पारसनाथजी महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीचे कार्य जाणून घेतले. या वेळी त्यांनी ‘हल्लीची पिढी धर्माचरण करत नाही. सध्याची हिंदूंची स्थिती दयनीय आहे’, असे सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment