रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. सौ. लक्ष्मी शशिकांत पाटील (पू. कलावतीआईंच्या भक्त), मु. माडीगुंजी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव, कर्नाटक.

अ. ‘आश्रम पाहून मला समाधान वाटले.

आ. आश्रमात आल्यावर मला सद्गुरूंचे महत्त्व समजले.

इ. या आश्रमासारखे वातावरण मी आणखी कुठेही अनुभवले नाही.

ई. येथे आल्यावर ‘देवाने मला आशीर्वाद दिला’, असे मी अनुभवले.’ (३०.४.२०२३)

२. श्री. रामा टोपाण्णा घाडी (पू. कलावतीआईंचे भक्त), मु. माडीगुंजी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव, कर्नाटक.

अ. ‘आज मी रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आलो आहे. तुमचे धर्माविषयीचे प्रवचन ऐकल्यावर ‘सात्त्विक आणि असात्त्विक म्हणजे काय ? देवतांची चित्रे अन् नामजप यांमध्ये किती सामर्थ्य आहे ?’, हे माझ्या लक्षात आले.

आ. ‘आश्रमजीवन प्रत्यक्षात कसे जगायचे ? जगामध्ये हिंदु संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे’, हे आश्रम पाहून मला समजले.

‘प्रत्येक माणसाने जीवनात साधना करावी आणि मानवजन्माचे सार्थक करून घ्यावे’, ही माझी कळकळीची विनंती !’ (३०.४.२०२३)

३. सौ. श्रद्धा सिनकर, मुलुंड, मुंबई.

अ. ‘आपण आश्रमातील उपक्रमात कुठल्यातरी प्रकारे सहभागी व्हावे’, असे मला वाटले.

आ. येथे अमाप सात्त्विक ऊर्जा जाणवली.

इ. येथे खरोखर किती समर्पणाने देशकार्य चालू आहे !

ई. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, आज हा आश्रम पहाण्याचा योग आला.’ (२८.५.२०२३)

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून दिलेले अभिप्राय

१. श्री. रामा टोपाण्णा घाडी

अ. ‘सूक्ष्म जगत् म्हणजे प्रत्यक्ष न दिसणारी दैवी शक्ती कशी आहे आणि नामजप हा किती सामर्थ्यवान आहे !’, हे कळून आले.

आ. आजच्या वैज्ञानिक जगतात सत्य आणि असत्य काय आहे ?’, हे लक्षात आले.’ (३०.४.२०२३)

२. सौ. श्रद्धा सिनकर

अ. ‘केवळ अद्भुत ! ‘आपल्याला आलेल्या अनुभवाला एवढा गहन अर्थ असू शकतो’, हे माझ्या लक्षात आले.

आ. ‘आपण किती अहंकार बाळगून असतो !’, याची मला पदोपदी जाणीव झाली.’ (२८.५.२०२३)

Leave a Comment