‘कोल इंडिया लिमिटेड’ आस्थापनाचे तंत्रनिर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) जितेंद्र मलिक यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – ‘कोल इंडिया लिमिटेड’ या शासकीय आस्थापनाचे तांत्रिक निर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) श्री. जितेंद्र मलिक यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. श्री. मलिक यांच्या भेटीच्या वेळी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. श्री. जितेंद्र मलिक यांनी आश्रमाचे व्यवस्थापन पाहून ते म्हणाले, ‘‘आश्रमातील सर्व व्यवस्था शिकून घेणे पुष्कळ महत्त्वाचे आहे. आश्रमात जसे प्रयत्न केले जातात, तशा प्रकारचे प्रयत्न प्रत्येकाने करायला हवेत.’’ ‘आश्रमातील सर्व साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहितात’, हे पाहून श्री. मलिक यांना त्याचे पुष्कळ कौतुक वाटले. या वेळी श्री. मलिक यांनी त्यांच्या आस्थापनाच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी ‘तणावमुक्तीसाठी साधना’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.

Leave a Comment