रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

१. ‘आश्रमातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन ! हे प्रदर्शन पाहिल्यावर ‘एखाद्या वस्तूवर वाईट शक्तीचा परिणाम कसा होऊ शकतो ?’, हे मला समजले. प्रदर्शनात ठेवलेले साहित्य पाहून मी प्रभावित झाले.’

– अधिवक्त्या (सौ.) स्वराग्नी मूर्ती, बेंगळुरू, कर्नाटक. (१२.६.२०२२)

२. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन अप्रतिम असून यात प्रत्येक गोष्टीमागील शास्त्र समजावून सांगितले आहे. ध्वनी-चित्रचकत्यांच्या माध्यमातून हे सर्व आपण विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या संख्येने पोचवू शकतो.’

– श्री. ए.व्ही. बागुर, बेंगळुरू, कर्नाटक. (१३.६.२०२२)

३. ‘आश्रमात असतांना मी जे अनुभवले, ते मला शब्दांत सांगता येत नाही. ती अनुभूती उत्कृष्ट आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रेरणादायी होती.’

– श्री. मानस सिंह रॉय, हावडा, बंगाल. (१३.६.२०२२)

४. ‘आश्रम पहातांना मला अतिशय दिव्य आणि जगावेगळीच अनुभूती आली.’

– श्री. ए.व्ही. बागुर, बेंगळुरू, कर्नाटक. (१३.६.२०२२)

५. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन अद्वितीय आहे. मी यापूर्वी अशा प्रकारच्या प्रदर्शनाविषयी ऐकले नव्हते आणि कल्पनाही केली नव्हती.’

– अधिवक्त्या (सौ.) रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड. (१३.६.२०२२)

६. ‘सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहिल्यानंतर येथे (आध्यात्मिक) ज्ञान आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम झाल्याची प्रचीती आली.’

– श्री. राम ज्ञानीदास महात्यागी (संस्थापक, महात्यागी सेवा संस्थान, श्री तिरखेडी आश्रम), गोंदिया, महाराष्ट्र. (१५.६.२०२२)

७. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘आजच्या काळातही जप-तप करून नकारात्मक ऊर्जा (negative energy) नष्ट होते’, असे वाटते.’

– प.पू. चंद्रकांत महाराज शुक्ल (जिल्हा प्रमुख, गुरुवंदना मंच) बलसाड, गुजरात. (१६.६.२०२२)

Leave a Comment