कोपरगाव येथे हिंदूसंघटन मेळाव्यात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे मार्गदर्शन !

१. हिंदूंनो, भारताला राज्यघटनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित
करण्यासाठी संघटित व्हा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस आणि बोलतांना श्री. गौरव जमधडे

कोपरगाव – भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, भारताला राज्यघटनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते येथील हिंदूसंघटन मेळाव्यात बोलत होते. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

२. वक्फ बोर्डाच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा उभारणे ही
काळाची आवश्यकता ! – गौरव जमधडे, जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

भूमी बळकावणे, खंडणी वसूल करणे, धर्मांतर करणे आदी षड्यंत्रे राबवणार्‍या वक्फ बोर्डाच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने लढा उभारणे, ही काळाची आवश्यकता आहे.

Leave a Comment