सनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍या सर्व संघटना आणि प्रसारमाध्यमे यांच्या विरोधात न्यायालयात जाणार ! – सनातन संस्था

आमची अपकीर्ती करणार्‍यांचा आम्ही केवळ निषेधच करत नाही, तर ज्या व्यक्तींनी सनातन संस्थेचा अपप्रचार केला आहे, तसेच ज्यांनी ‘या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ गायलेच गेले नाही’, असा खोटा प्रचार केला आहे, त्या सर्वांना आम्ही कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. राज्यघटनेच्या चौकटीत त्यांना उत्तर द्यावेच लागेल.

केंद्रशासनाने सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला ६३ लाख रुपये दिल्यावरून काँग्रेस आणि साम्यवादी यांना पोटशूळ !

हिंदूंना जागृत करण्यासाठी महोत्सवात दिशादर्शन करण्यात आले. स्वत:च्या प्राणाचे, धर्माचे आणि समुदायाचे रक्षण करणे, हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असतांना यासाठी हिंदू जागृत होऊन प्रयत्न करत असतील, तर काँग्रेससारख्या पक्षाला ते कधीतरी पचेल का ?

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट !

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांची सनातन आश्रमाला मंगलमय भेट ! या प्रसंगी सनातनच्या साधकांनी ‘रामरूपी रामरंगी । दर्शनाची हीच संधी । दर्शनाची हीच संधी ॥’ सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराजांच्या या भजनपंक्ती ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवल्या.

महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !

प्रदर्शनाला खासदार, आमदार, नगरसेवक आणि अन्य मान्यवर यांच्या उत्स्फूर्त भेटी !

ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश) आणि गाझियाबाद (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) येथे आयोजित केलेल्या ‘विशाल हिंदु परिषदे’त सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन

विशाल हिंदु परिषदेच्या आयोजन समितीचे सदस्य आणि रा.स्व. संघाचे कार्यकर्ते श्री. आशिष भारती यांनी सनातन संस्थेच्या प्रदर्शनाचे कौतुक केले.

ठाणे येथे विविध मान्यवरांनी दिली सनातनच्या महाशिवरात्री ग्रंथप्रदर्शनाला भेट !

सनातन संस्थेने महाशिवरात्री निमित्त ठाणे येथे १३, डोंबिवली येथे १०, बदलापूर येथे ३, कल्याण आणि अंबरनाथ येथे एका ठिकाणी, असे ग्रंथप्रदर्शन अन् विक्रीकेंद्र उभारून व्यापक धर्मप्रसार करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यामध्ये ५०, बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ येथे आणि लातूर जिल्ह्यात २, धाराशिव जिल्ह्यात ६ ठिकाणी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.

सनातनच्या साधकांनी घेतली प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची भेट

येथील गोवा पुस्तक मेळाव्यात आयोजित करण्यात आलेल्या साहित्यिक सत्रात सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. सचिन पिळगावकर सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर सनातन संस्थेचे साधक श्री. नारायण नाडकर्णी यांनी श्री. पिळगावकर यांची सदिच्छा भेट घेतली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आयोजित ‘विशाल हिंदु परिषदे’त सनातनचे ग्रंथप्रदर्शन

येथील गणेशरा भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने ‘विशाल हिंदु परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

चाणक्य मालिकेचे निर्माता चंद्रप्रकाश द्विवेदी यांना सनातनचा ग्रंथ भेट

दूरदर्शनवर प्रसारित झालेली आणि अत्यंत गाजलेली मालिका ‘चाणक्य’चे निर्माता आणि त्यात आर्य चाणक्य यांची प्रमुख भूमिका साकारणारे डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचा साहित्यिक सत्रात ६ फेब्रुवारी या दिवशी कार्यक्रम होता.

‘गोवा पुस्तक महोत्सवा’तील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद !

‘गोवा पुस्तक महोत्सवा’त लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सकाळच्या सत्रात प्रामुख्याने राज्यातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रदर्शनस्थळी भेट देत असून दुपारनंतर अन्य नागरिक भेट देत आहेत.