सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे सुपुत्र श्री. रवि कसरेकर यांची वंदनीय उपस्थिती

रामनाथी (गोवा) – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते श्री. चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री सौ. मोहिनी पोतदार यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे सुपुत्र श्री. रवि कसरेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. आश्रमाद्वारे चालू असलेले राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रसारकार्याविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यम समूहाचे उपसंपादक श्री. विक्रम डोंगरे यांनी त्यांना करून दिली. सुश्री मिल्की अग्रवाल, सुश्री तेजल पात्रीकर आणि सौ. शुभांगी शेळके यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून चालू असलेले संगीत क्षेत्र, तसेच आध्यात्मिक संशोधनकार्य यांविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी अत्यंत जिज्ञासेने कार्य जाणून घेतले.
🎬 A memorable visit to the Sanatan Prabhat Media Group headquarters!
Acclaimed Marathi actor Chinmay Udgirkar (@CUdgirkar), celebrated for Nanda Saukhya Bhare, Sakkhe Shejari and Ghadge & Suun, along with talented actress Mohini Potdar, known for Sambhaji 1689, Ashi Hi Bhaubeej… pic.twitter.com/gDs1de4Wbx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2026

आश्रम पाहिल्यानंतर सनातन धर्माच्या हितासाठीच कार्य करण्याचा मी निर्धार केला ! – अभिनेते चिन्मय उदगीरकर
या प्रसंगी श्री. उदगीरकर म्हणाले की, आश्रमात आल्यावर मला उमगले की, मी आजपर्यंत प्रथम साधक आणि उपासकच होतो अन् नंतर अभिनेता झालो. यापुढे मला सनातन धर्माच्या हितासाठीच कार्य करायचे आहे. याचा मी निर्धार केला आहे.
सनातन आश्रमासंदर्भात बोलतांना ते म्हणाले की, भारतात अनेक आश्रम आहेत, पण असा आश्रम मी पाहिला नाही. येथील महत्त्व म्हणजे येथे ‘स्वत:ला कसे स्वीकारायचे’, ‘स्वत:वर प्रयोग कसे करायचे’, हे येथे शिकायला मिळते. येथे पराभवाचा प्रश्न नाही, तर (साधनेसाठी) प्रयत्न करत रहायचे आहे. येथील साधक स्वत:ही सिद्ध होत आहेत आणि इतरांनाही सिद्ध करत आहेत. भारतभरात असे कार्य कुठेही नाही. मी शब्दापलीकडील अनुभूती घेत आहे.
ते पुढे म्हणाले की, आज समाजाला दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने आपण करत असलेले कार्य अत्यंत मौल्यवान आहे. पुढील १० वर्षांत समाजाला आपण काय द्यायचे ?, याची दिशा-धोरण निश्चित झाले पाहिजे. आज लिखाणाच्या क्षेत्रात चांगले कार्य करणारे अत्यंत अल्प लोक आहेत. या दृष्टीने आपण नियोजन करणे काळाची आवश्यकता आहे.
सनातन आश्रम फार अद्भुत ! – अभिनेत्री मोहिनी पोतदार
या वेळी अभिनेत्री सौ. पोतदार यांनीही त्यांचे भाव प्रकट केले. त्या म्हणाल्या की, सनातन आश्रम फार अद्भुत आहे. मला घरी जायची अजिबात इच्छा नाही. येथेच रहावेसे वाटते. मी येथे पुन्हा येईन. त्यांना आश्रम पहातांना विविध अनुभूती आल्या, तसेच त्यांनी अधून-मधून ध्यानावस्था अनुभवल्याचे सांगितले.
अभिनेत्री मोहिनी पोतदार यांचा संक्षिप्त परिचय !
अभिनेत्री सौ. मोहिनी पोतदार या मूळच्या नाशिक येथील आहेत. त्यांनी ‘कर्तव्य’, ‘अशी ही भाऊबीज’, ‘जगत जननी श्री महालक्ष्मी’, ‘रघुपती राघव राजाराम’, ‘संभाजी १६८९ (छत्रपती संभाजी)’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांत भूमिका निभावली आहे. अभिनेत्री असण्यासमवेतच त्या ‘ऑरा हीलर’, तसेच कलाकारही आहेत. त्यांना अभिनयासमवेतच गायन, नृत्य, चित्रकला आदी अनेक कला अवगत आहेत. तसेच त्या आध्यात्मिक साधनाही करतात.
अभिनेते चिन्मय उदगीरकर यांचा संक्षिप्त परिचय !
अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री. चिन्मय उदगीरकर हेही मूळचे नाशिक येथील आहेत. त्यांनी ‘नांदा सौख्य भरे’, ‘सख्खे शेजारी’, ‘घाडगे अँड सून’ यांसारख्या दूरचित्रवाहिनीवरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनय केला आहे. त्यांनी शंकर महाराजांचे चरित्र रेखाटणार्या ‘योग योगेश्वर जय शंकर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सध्या ते आध्यात्मिक नदी असलेल्या नर्मदेवरील चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यासाठी त्यांना श्री. रवि कसरेकर यांचे अमूल्य आध्यात्मिक मार्गदर्शन लाभत आहे. श्री. उदगीरकर स्वत:ही आध्यात्मिक साधना करतात.
कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
