
देहली – येथील साधक श्री. हरीश कपूर आणि सौ. मंजुला कपूर यांच्या निवासस्थानी २६ जुलै २०२६ या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगासाठी देहलीतील साधकांना निमंत्रित करण्यात आले होते, तसेच मथुरा सेवाकेंद्रातील साधक भ्रमणभाषद्वारे या सत्संगाला जोडले होते.
सत्संगाच्या प्रारंभी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी साधकांकडून गुरुपौर्णिमेच्या सेवांचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर त्यांनी अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांच्या विधीसेवांविषयी जाणून घेतले. अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा या राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधात सतत कार्यरत असतात. या सेवेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. या वेळी त्यांनी स्वतःला मिळणारा प्रतिसाद आणि आलेल्या अनुभूतींबद्दल माहिती दिली. त्यानंतर सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित केले.
सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले, ‘‘सौ. अमिता सचदेवा यांच्यामध्ये व्यष्टीसह समष्टीबद्दलही भाव आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे कार्य करण्याची त्यांच्यात तीव्र तळमळ अन् क्षात्रभाव आहे. न्यायालयीन सेवा त्या उत्तमरित्या गुरुसेवा म्हणून करत आहेत. आता त्यांनी ‘शिष्य अमिता’ होऊन श्री गुरूंचे कार्य अधिक वेगाने पुढे नेणे आणि व्यष्टी साधना वाढवणे आवश्यक आहे.’’
मनोगत व्यक्त करतांना अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा म्हणाल्या, ‘‘श्री गुरूंनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी) माझा हात धरून ठेवला आहे आणि तो ते कधीही सोडणार नाहीत’, असा माझा भाव असतो. मी व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवीन. माझ्याशी जोडलेले अन्य अधिवक्ता माझ्यातील दोषांमुळे गुरुकार्यापासून दूर जाऊ नयेत, यासाठी मी सतत प्रयत्न करीन.’’
धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी गाठली ६४ टक्के, तर भगवंताविषयी अपार भक्ती असलेले...
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !
भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार...
निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान
धर्मशास्त्रांचा अभ्यास आणि विलक्षण नम्रता असलेले डॉ. शिवनारायण सेन संतपदी विराजमान
राममंदिर उभारण्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन संतपदी विराजमान !