सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराजांच्या छायाचित्रात मे २०१० (मूळ छायाचित्र) ते मार्च २०२५ या कालावधीत झालेल्या पालटांचे संशोधन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रांचा कालावधी, त्या छायाचित्रांत झालेले वेगवेगळे पालट आणि त्या छायाचित्रांची स्पंदने

‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरात त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे मूळ छायाचित्र मे २०१० मध्ये ठेवण्यात आले. मे २०१० ते मार्च २०२५ या १५ वर्षांच्या कालावधीत त्या छायाचित्रामध्ये वेगवेगळे पालट होत गेले. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात पालट झाल्याचा कालावधी आणि त्याचे वैशिष्ट्य यांची त्या त्या वेळी नोंद करण्यात आली, तसेच त्या त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राचे पुन्हा छायाचित्रही काढण्यात आले. प.पू. भक्तराज महाराज यांच्या नोंद करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या एकूण ८ छायाचित्रांमध्ये सूक्ष्मातील कोणती स्पंदने होती, हे पुढे दिले आहे.

 

२. मे २०१० ते मार्च २०२५ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या पालट झालेल्या छायाचित्रांचा केलेला अभ्यास

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे देवघर

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे मूळ छायाचित्र

अ. मे २०१० – मूळ छायाचित्र : प.पू. भक्तराज महाराज यांच्या या छायाचित्रात मुख्यत्वे निर्गुण स्पंदने ९० टक्के आहेत. या पुष्कळ अधिक प्रमाणात असलेल्या निर्गुण स्पंदनांमुळे त्या छायाचित्रात ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या स्पंदनांपैकी शांतीची स्पंदने सर्वाधिक (४० टक्के) आहेत. ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या स्पंदनांपैकी शांतीची स्पंदने सर्वाधिक निर्गुण स्तराची असतात, तर शक्तीची स्पंदने सर्वाधिक सगुण स्तराची असतात.

२ आ. ऑगस्ट २०१० – छायाचित्रात जिवंतपणा जाणवणे : एखाद्या छायाचित्रात जेव्हा जिवंतपणा जाणवतो, तेव्हा त्यातील सगुण स्पंदने वाढलेली असतात आणि निर्गुण स्तराची स्पंदने अल्प झालेली असतात. त्याप्रमाणेच या छायाचित्रात आढळून आले. प.पू. भक्तराज महाराज यांच्या मूळ छायाचित्राच्या तुलनेत त्यांच्या या छायाचित्रात सगुण स्पंदनांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आणि निर्गुण स्पंदनांमध्ये तेवढ्याच प्रमाणात घट झाली. त्यामुळे या छायाचित्रातील शांतीची स्पंदने १० टक्क्यांनी अल्प झाली, तसेच भाव आणि चैतन्य यांची स्पंदने प्रत्येकी ५ टक्क्यांनी वाढली.

२ आ १. एखाद्या छायाचित्रात जिवंतपणा येण्याचे कारण : एखाद्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवू लागतो, तो आपल्यातील त्या छायाचित्राप्रती असलेल्या आध्यात्मिक भावामुळे ! आपण त्या छायाचित्राची प्रतिदिन मनोभावे पूजा केली, त्याला आळवले की, आपल्यातील त्या भावभक्तीमुळे त्या छायाचित्रातील सगुण तत्त्व वाढते. त्यामुळे ते छायाचित्र जागृत जाणवू लागते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती उत्कट भाव आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवू लागला.

२ इ. मार्च २०१२ – मुखमंडल पिवळसर होणे आणि प्रभावळ विरळ होणे : प.पू. भक्तराज महाराज यांच्या या छायाचित्रात शक्तीची स्पंदने आधीच्या (ऑगस्ट २०१० मधील) छायचित्रापेक्षा १ टक्क्याने वाढली आहेत. ‘छायाचित्राच्या मुखमंडलावर पिवळसर छटा आल्यावर छायाचित्रातील शक्तीची स्पंदने वाढली’, असे लक्षात येते. तसेच या छायाचित्रात आनंदाची स्पंदने आधीच्या छायाचित्रापेक्षा ५ टक्क्यांनी वाढली असल्याचेही लक्षात येते.

२ इ १. छायाचित्रात प.पू. भक्तराज महाराज यांच्या मुखमंडलावर पिवळसर छटा आल्यामुळे झालेला लाभ : या कालावधीत सनातन संस्थेवर बंदी येण्याचे संकट आले होते. अशा परिस्थितीत साधक स्थिर रहावेत आणि त्यांना शक्ती मिळावी, यांसाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे त्यांच्या छायाचित्रातील त्यांच्या मुखमंडलावर पिवळसर छटा आली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात हा स्थुलातील पालट झाल्यामुळे साधक निश्चिंत झाले. तसेच या कालावधीत ‘सनातन राष्ट्र’ (हिंदु राष्ट्र) साकार होण्यासाठी हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या देशभरातील संघटनांना एकत्र आणि एका व्यासपिठावर आणण्यासाठी प्रतिवर्षी जूनमध्ये ‘अखिल भारतीय हिंदु अधिवेशन’ घेण्याचे ठरवण्यात आले. त्याचा आरंभ या वर्षी होणार होता. या व्यापक कार्यासाठीही प.पू. भक्तराज महाराज यांनी शक्ती पुरवली.

२ इ २. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील आनंदाची स्पंदने वाढण्याचे कारण : सनातन संस्थेवर बंदी येण्याच्या संकटावर सूक्ष्मातून मात करण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील आनंदाची स्पंदने वाढली. ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’ या स्पंदनांपैकी ‘आनंद’ आणि ‘शांती’ या स्पंदनांमध्ये अधिक प्रमाणात निर्गुण स्तराची स्पंदने असतात. निर्गुण स्पंदनांमुळे सूक्ष्मातील कार्याला बळ मिळते. या तुलनेत ‘शक्ती’ आणि ‘भाव’ या स्पंदनांमध्ये अधिक प्रमाणात सगुण स्तराची स्पंदने असतात. सगुण स्पंदनांमुळे स्थुलातील कार्याला बळ मिळते.

२ इ ३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या चेहर्‍याभोवतीची प्रभावळ विरळ होण्याचे कारण : देवता आणि संत यांच्या चेहर्‍याभोवती असलेली प्रभावळ त्यांच्या कार्याचे स्वरूप अन् प्रमाण दर्शवते. प्रभावळ गडद आणि मोठी होणे, हे सगुण कार्याला बळ देण्याचे प्रमाण वाढल्याचे दर्शक आहे. प्रभावळ विरळ आणि अल्प होणे, हे सूक्ष्मातील कार्य वाढल्याचे दर्शक आहे. तसेच गडद प्रभावळीच्या भोवती विरळ प्रभावळही पसरलेली दिसणे (प्रभावळीचा विस्तार होणे) हे सगुणातील कार्याला बळ देण्याप्रमाणेच सूक्ष्मातील कार्यही घडत असल्याचे दर्शक आहे. तसेच ते कार्याचे व्यापकत्वही दर्शवते. मार्च २०१२ या कालावधीत सनातन संस्थेवर आलेले बंदीचे संकट टळण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांचे सूक्ष्मातील कार्य वाढले.

२ ई. सप्टेंबर २०१३ – मुखमंडल आणखी पिवळे होणे आणि प्रभावळ गुलाबी होणे : या कालावधीत छायाचित्रातील प.पू. भक्तराज महाराज यांचे मुखमंडल आणखी पिवळे झाल्याचे लक्षात आले. त्या वेळी या छायाचित्रातील शक्ती आणि चैतन्य यांची स्पंदने आधीच्या (मार्च २०१२ मधील) छायाचित्राच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढली. यातून या कालावधीत प.पू. भक्तराज महाराज यांचे सनातनच्या साधकांना स्थुलातील कार्याला बळ देण्याचे प्रमाण आणखी वाढल्याचे लक्षात आले. या कालावधीत सनातन संस्थेचे कार्य आणखी वाढले होते.

या कालावधीत जसे प.पू. भक्तराज महाराज यांचे मुखमंडल आणखी पिवळे झाले, तसेच त्यांची प्रभावळही गुलाबी झाली. चेहर्‍याभोवतीची प्रभावळ गुलाबी होणे, हे प्रीतीचे दर्शक आहे. यावरून या कालावधीत प.पू. भक्तराज महाराज यांनी साधकांना केवळ बळ पुरवले नाही, तर त्यांच्याप्रती प्रीतीही दर्शवली. यातून प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेचा ओघ वाढल्याचे लक्षात येते.

२ उ. जानेवारी २०१५ – छायाचित्रात हिरवट छटा दिसणे आणि प्रभावळ पांढरी होणे : छायाचित्रामध्ये हिरवट छटा निर्माण होणे, हे समृद्धी आणि नवनिर्मिती होत असल्याचे दर्शवते. त्या कालावधीत सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य सर्वदूर पसरून जनमानसात परिचित झाले. त्या कार्याला मान्यता मिळून सनातन संस्थेसह अन्य संस्था एकजुटीने उभ्या राहून हिंदु राष्ट्र, म्हणजेच सनातन राष्ट्र येण्यासाठी सर्वांनी निर्धार पक्का केला होता. एक प्रकारे सनातन संस्थेसाठी तो सुवर्णकाळ होता. आता सनातन राष्ट्राचा उद्घोष देशभर होण्यास आरंभ झाला. हीच ती नवनिर्मिती आणि समृद्धी होती. त्याचीच प्रचीती प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राने हिरवट छटा स्वतःवर आणून दिली.

२ उ १. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रावर हिरवट छटा आल्यावर छायाचित्रात पालटलेली स्पंदने : या छायाचित्रात शक्ती, भाव आणि चैतन्य यांची स्पंदने आधीच्या (सप्टेंबर २०१३ मधील) छायाचित्रापेक्षा १ ते ३ टक्क्यांनी वाढली. याचा अर्थ छायाचित्रामधील सगुण तत्त्वामध्ये वाढ झाली. हेच छायाचित्राच्या सगुण आणि निर्गुण स्पंदनांद्वारेही दिसते. या छायाचित्रामधील सगुण स्पंदनांमध्ये आधीच्या (सप्टेंबर २०१३ मधील) छायाचित्रापेक्षा ५ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे छायाचित्रामधील शांतीची (निर्गुण स्तराची) स्पंदने ६ टक्क्यांनी अल्प झाली. यातून ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वतः सगुण स्तरावर येऊन सनातनच्या कार्याला बळ दिले’, हे लक्षात येते.

२ उ २. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात चेहर्‍याभोवतीची प्रभावळ पांढरी होण्याचे कारण : हा काळ सनातनच्या समृद्धीचा आणि नवनिर्मितीचा असल्याने आता साधकांना प्रीतीची आवश्यकता नव्हती. त्यांना प्रेरणेची आवश्यकता होती. त्यामुळे प.पू. भक्तराज महाराज यांच्या चेहर्‍याभोवतीची प्रभावळ गुलाबी न रहाता पांढरी झाली. यावरून ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रात काळानुरूप कसे पालट झाले’, हे लक्षात येते. ‘प.पू. भक्तराज महाराज यांचे, म्हणजे गुरूंचे साधकांकडे कसे लक्ष आहे’, हे यातून साधकांना कळते आणि ‘गुरूंची कृपा आपल्यावर आहे’, हेही त्यांना समजते.

 

२ ऊ. एप्रिल २०२३ – चेहरा धूसर आणि प्रभावळ गुलाबी दिसणे : एप्रिल २०२३ हे वर्ष आपत्काळाच्या जवळ आले होते. नुकतीच ‘कोरोना महामारी’ येऊन गेली होती. काही देशांमध्ये आपापसांत युद्धही चालू झाले होते आणि ‘तिसरे महायुद्ध आता हाेऊ शकते’, असे अमेरिका, रशिया यांसारखे बलाढ्य देश म्हणत होते. अशा पार्श्वभूमीवर एप्रिल २०२३ मध्ये छायाचित्रातील प.पू. भक्तराज महाराज यांचा चेहरा धूसर झाला. प.पू. भक्तराज महाराज यांचा चेहरा धूसर होणे, हे त्यांचे निर्गुण तत्त्व वाढल्याचे दर्शक आहे. निर्गुण तत्त्व हे अधिक सूक्ष्म असते आणि त्याची क्षमता सगुण तत्त्वापेक्षा पुष्कळ पटींनी अधिक असते. त्यामुळे ते आपत्काळात रक्षण करू शकते. ‘आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांचा चेहरा धूसर झाला’, असे जाणवले. तसेच प.पू. भक्तराज महाराज यांची प्रभावळ गुलाबी होणे, हे त्यांची प्रीती दर्शवते. प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रीतीमुळेही साधकांचे आपत्काळात रक्षण होते.

२ ऊ १. प.पू. भक्तराज महाराज यांचा चेहरा धूसर झाल्यावर त्यांच्या स्पंदनांमध्ये झालेले पालट : प.पू. भक्तराज महाराज यांचा चेहरा धूसर झाल्यावर त्यांच्यातील निर्गुण तत्त्व आधीच्या (जानेवारी २०१५ मधील) छायाचित्रापेक्षा १० टक्क्यांनी वाढले आणि ते ८० टक्के झाले. तसेच त्यांच्यातील शांतीची स्पंदनेही ३ टक्क्यांनी वाढून ती २३ टक्के झाली.

२ ए. फेब्रुवारी २०२४ – निर्गुण तत्त्व वाढणे आणि प्रभावळ गडद होणे : फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्व साधक आपत्काळाच्या आणखी थोडे जवळ गेल्याने प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रामधील निर्गुण तत्त्व आधीच्या (एप्रिल २०२३ मधील) छायाचित्राच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढून ८२ टक्के झाले, तसेच शांतीची स्पंदने १ टक्क्याने वाढली. त्यामुळे प.पू. भक्तराज महाराज यांचा चेहरा थोडा अधिक धूसर दिसू लागला.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रामधील आणखी एक पालट म्हणजे त्यांच्या चेहर्‍याभोवतीची प्रभावळ आधीच्या (एप्रिल २०२३ मधील) छायाचित्राच्या तुलनेत गडद झाली. प्रभावळ गडद होणे, हे कार्य आणखी वाढल्याचे दर्शक आहे. आपत्काळात साधकांचे रक्षण होण्यासाठी, तसेच साधकांच्या समष्टी सेवेमध्ये आध्यात्मिक बळ पुरवण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांचे तत्त्व आणखी अधिक प्रमाणात कार्यरत झाले.

२ ऐ. मार्च २०२५ – सगुण तत्त्व वाढणे, चेहर्‍यावर आनंद जाणवणे आणि प्रभावळीचा विस्तार होणे : मार्च २०२५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील त्यांचा चेहरा थोडा स्पष्ट दिसू लागला. यावरून त्यांचे सगुण तत्त्व थोडे वाढल्याचे जाणवले. छायाचित्राच्या स्पंदनांवरून लक्षात येते की, आधीच्या (फेब्रुवारी २०२४ मधील) छायाचित्राच्या तुलनेत या छायाचित्रातील त्यांचे सगुण तत्त्व २ टक्क्यांनी वाढले आहे. त्याप्रमाणेच त्यांच्यातील शांतीची स्पंदने ५ टक्क्यांनी अल्प होऊन आनंदाची स्पंदने ५ टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे प.पू. भक्तराज महाराज यांच्या चेहर्‍यावर आनंद अधिक प्रमाणात जाणवतो.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

२ ऐ १. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील त्यांचे सगुण तत्त्व वाढण्याचे कारण : हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे एक धर्मयुद्ध आहे. त्यामध्ये सूक्ष्मातील वाईट शक्तींशी लढावे लागते. प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने १.८.१९९१ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ स्थापन केल्यापासून ते वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत आहेत. आता वाईट शक्तींची शक्ती अल्प झाली आहे. त्यामुळे आता त्या स्थुलातील तिसर्‍या महायुद्धामध्ये अधर्माच्या बाजूने असणार्‍यांना साहाय्य करू लागतील. आता यापुढील काळ अधिकतर स्थुलातून कृती करण्याचा काळ असल्याने या कार्यामध्ये साधकांना साहाय्य करण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील त्यांचे सगुण तत्त्व आता वाढले आहे.

२ ऐ २. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील त्यांच्या चेहर्‍याभोवतीच्या प्रभावळीचा विस्तार झालेला दिसण्याचे कारण : आता सनातन संस्था आणि तिच्या सहयोगी संस्था यांचे कार्य व्यापक होऊन ते जगभर होऊ लागल्याने या कार्याला आध्यात्मिक पाठबळ देण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांनीही त्यांच्या प्रभावळीचा विस्तार करून त्यांचे कार्य अधिक व्यापक केले आहे.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (रसायनशास्त्रातील पीएच्.डी., मुंबई विद्यापीठ), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.१२.२०२५)

Leave a Comment