राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !

मुंबई, १२ मे (वार्ता.) – महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना सनातन संस्थेच्या वतीने १७ मे या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण देण्यात आले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी १२ मे या दिवशी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना या महायज्ञाचे निमंत्रण दिले.
Hon’ble Governor of Maharashtra, Shri. Jishnu Dev Varma Ji (@Jishnu_Devvarma), has been cordially invited as the Chief Guest for the sacred 🔥“Shri #Rajamatangi Mahayagya” organized by Sanatan Sanstha for the welfare of the nation, preservation of Dharma, and the spiritual… pic.twitter.com/QdW5WjRdoG
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) May 12, 2026
या वेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ‘यज्ञाला येण्याचा प्रयत्न करतो’, असे सांगितले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर, श्री. अशोक दाभोळकर आणि श्री. प्रीतम नाचणकर उपस्थित होते.

या वेळी श्री. चेतन राजहंस यांनी राज्यपालांना सनातन संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली, तसेच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी श्री. राजहंस यांनी राज्यपालांना सनातनचे ग्रंथ भेट दिले.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांना श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण
मुंबई – महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांना सनातन संस्थेच्या वतीने मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण देण्यात आले. तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मंत्रालयामध्ये भेट घेऊन मंत्रीमहोदयांना या यज्ञाचे निमंत्रण दिले. १७ मे या दिवशी प्रभादेवी येथील नर्दुल्ला टँक पटांगणात दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० वेळेत हा महायज्ञ शेकडोंच्या उपस्थितीत पार पडेल.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...