तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्यांना आनंदाने तोंड कसे द्यायचे, याचा आदर्श देहत्यागाच्या क्षणापर्यंत सर्वांसमोर ठेवणार्या पू. (सौ.) सखदेवआजी !
पू. (सौ.) सखदेवआजी संत होण्यापूर्वी साधारण २०१० या वर्षी अत्यवस्थ होत्या. त्यांना वारंवार डायलिसिसवर ठेवावे लागत होते. त्यानंतर आजतागायत त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एक दैवी चमत्कारच !