महाबळेश्‍वर येथे प्रती १२ वर्षांनी कन्यागत महापर्वकालात गंगेचा प्रवाह कृष्णा नदीत प्रवेश करतो आणि या चमत्काराचे केलेले संशोधन, तसेच त्याची कथा !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराक आणि वैज्ञानिकांना आवाहन !

१. गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश करणे, म्हणजे कन्यागत महापर्वकाल !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

११.८.२०१६ या दिवशी गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला. या शुभमुहूर्तावर कृष्णा नदीच्या काठी कन्यागत महापर्वकाल साजरा केला जातो. या मुहूर्तावर गंगेचे पाणी कृष्णा नदीत प्रवेश करते. कृष्णेचा उगम महाबळेश्‍वर येथे आहे. ११.८.२०१६ या दिवशी बरोबर रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी गंगेचे पाणी गोमुखातून खाली आले. प्रती १२ वर्षांनी एकदा हा चमत्कार घडतो.

 

 

 

२. गुरु ग्रहाने कन्या राशीत प्रवेश
करण्याच्या मुहूर्तकाळीच गंगेने तत्त्वरूपामध्ये
महाबळेश्‍वर येथील पाण्याच्या पन्हाळीकडे धाव घेणे
आणि या घटनेचे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने टिपलेले क्षण !

या क्षणाचे चित्रीकरण करण्यासाठी गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक गेले होते. तसेच या क्षणाचे संशोधन करण्यासाठी त्याच मुहूर्तावर तेथील पन्हाळीतून येणार्‍या पाण्याचा नमुनाही रामनाथी आश्रमात आणला गेला. काही भौगोलीक कारणांमुळे या वेळी जरी गंगेचे पाणी प्रत्यक्ष या गोमुखातून येतांना दिसले नाही, तरी गंगेचे तत्त्व तरी या पाण्यात नक्कीच प्रवेश करत असणार; कारण आपल्या परंपरांना असलेला अध्यात्मशास्त्रीय आधार. यापूर्वी महाबळेश्‍वर परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे गंगेच्या मुखामध्ये आधीच काही प्रमाणात पाण्याचा ओलावा आणि थोडे पाणी दिसत होते.

 

३. प्रत्यक्ष पन्हाळीतून गंगेचे पाणी येतांना दिसले नाही,
तरी या गंगेच्या पाण्याच्या प्रवेशाच्या मुहूर्ताच्या वेळी
घेतलेल्या पाण्याच्या नमुन्याने प्रत्यक्ष गंगेच्या पाण्यासारखीच
प्रभावळ वैज्ञानिक उपकरणाद्वारे घेतलेल्या चाचणीतून दाखवणे

गंगेच्या मुखामधून आधीपासूनच पाणी वहात होते, मग तेथून या मुहूर्तावर गंगेचे पाणी आले, याला पुरावा काय ?, असे बुद्धीप्रामाण्यवादी विचारतील. त्यांना या प्रश्‍नाचे उत्तर मिळावे, म्हणून गंगेचे पाणी जेथून येते, तेथूनच नेमका पाण्याचा नमुना आम्ही घेतला आणि रामनाथी आश्रमात जाऊन या पाण्याची प्रभावळ पिप नावाच्या प्रणालीने पडताळली. तसेच प्रत्यक्ष वाराणसी येथील गंगेच्या पाण्याची प्रभावळही पडताळली, तर काय आश्‍चर्य ? या दोन्ही पाण्यांच्या प्रभावळी सारख्याच होत्या.

 

४. तात्पर्य – पूर्वी गंगेचे पाणी प्रत्यक्ष येतांना दिसणे;
परंतु आता भौगोलिक परिस्थितीतही पालट झाल्याने आणि
पृथ्वीवरील रज-तमाचे प्रमाण वाढल्याने प्रत्यक्ष पाणी येतांना न दिसणे

यातून हेच सिद्ध झाले की, खरोखरंच, या मुहूर्ताला त्या पाण्यात गंगेचे तत्त्व प्रवेश करते. हे तत्त्व प्रकाशरूपाने येते. दर वेळी प्रत्यक्ष पाणी येतांना दिसेल, असे नाही. १२ वर्षांपूर्वी पाण्याचा ओघ प्रवेश करतांना प्रत्यक्ष दिसला होता, असे जाणकार सांगतात. आता १२ वर्षांत भौगोलिक परिस्थितीही पालटली आणि भूगर्भातही अनेक पालट झाल्याने रज-तमाच्या प्रभावाने प्रत्यक्ष गंगेचा प्रवाह दिसला नाही, तरी ते तत्त्व पाण्यात येते, हे पाण्याने दाखवलेल्या गंगेच्या पाण्यासारख्याच प्रभावळीने सिद्ध केले.

 

५. गंगा नदीने सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना दिलेले वचन
इतकी युगे लोटली, तरी अजूनही पाळणे; परंतु आजकालचा
मानव इतका कृतघ्न आहे की, तो कालचा शब्द आज मानत नसणे

देव आपले आज्ञापालन करणे कधीच सोडत नाही. सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींना दिलेले वचन अजूनही इतकी युगे लोटली, तरी गंगा नदी पाळतच आहे; परंतु आजकालचा मानव इतका कृतघ्न आहे की, कालचा शब्द आज मानत नाही. अशा माणसाला देवाने का साहाय्य करावे बरे ? सहस्रोंच्या संख्येने कृष्णेच्या काठी गंगानदीच्या स्नानाचा आनंद मिळवण्यासाठी जे भक्तगण जमतात, त्यांच्याच श्रद्धेला मान देऊन गंगा नदी प्रत्येक १२ वर्षांनी भक्तांच्या भेटीला येते.

 

६. वैज्ञानिकांना आवाहन !

यावर वैज्ञानिकांनी संशोधन करावे. हे पाणी सहस्रो किलोमीटरचे अंतर पार करून एका क्षणात येथे कसे येते, याचाही विचार करावा.

६ अ. प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे
सोपे असणे; परंतु ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी अपार कष्ट घ्यावे
लागत असणे आणि हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून घेतले जाणे

भारतात असे अनेक चमत्कार घडत आहेत; परंतु याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे सोपे आहे; तसे केले की, काही करावेच लागत नाही; परंतु सिद्ध करायचे झाल्यास मात्र अपार कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक घेत आहेत आणि देवाच्या कृपेला पात्रही होत आहेत.
लवकरच या पाण्याचे केलेले अध्यात्मशास्त्रीय संशोधन दैनिक सनातन प्रभातमधून प्रसिद्ध करत आहोत.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (२१.८.२०१६, सकाळी १०.०१)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात