पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !
‘प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्याच अपेक्षा असतात ; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या मर्यादांचे योग्य ते भान ठेवले नाही, तर मातापित्यांच्या आकांक्षा या मुलांना न पेलणारे ओझे बनते.