१ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठणे, ही सत्त्वगुणी समाजनिर्मितीची प्रचीती !
सनातनचे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या अन्य संघटनांचे साधक ‘गुरुकृपायोगानुसार साधने’चा अंगीकार करतात. त्यांचे भाग्य म्हणजे त्यांना साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन लाभते आणि ‘स्वतःची साधनेची वाटचाल कुठपर्यंत आली’, हेही कळते.