आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांची देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

श्री. विवेक पाटील यांचा सत्कार करतांना श्री. शिवाजी वटकर

देवद (पनवेल) : शेतकरी कामगार पक्षाचे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री. बाळाराम पाटील आणि माजी आमदार श्री. विवेकानंद पाटील यांनी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला १५ फेब्रुवारीला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातनचे कार्य आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांसाठी शुभेच्छाही दिल्या. आमदार श्री. बाळाराम पाटील यांना महर्षि अध्यात्म विश्विविद्यालय आणि श्री. विवेकानंद पाटील यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा हे सनातनचे ग्रंथ देऊन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांचा सत्कार केला. दोघांनीही आश्रमातील ध्यानमंदिरात जाऊन नमस्कार केला. मध्यंतरीच्या काळात योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचेही आशीर्वाद घेतल्याचे आमदार श्री. बाळाराम पाटील यांनी सांगितले.

सात्त्विक उत्पादनांचा पाया सनातनने रचला आहे ! – श्री. विवेकानंद पाटील

सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादनांविषयी श्री. विवेकानंद पाटील म्हणाले, सध्या अनेकजण आपापली उत्पादने काढत आहेत; मात्र या सात्त्विक उत्पादनांचा (पूजाअर्चेच्या साहित्साठी उपयुक्त असलेले) पाया सनातनने रचला आहे. सनातनची उत्पादने मला आवडतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment