चतु:श्रृंगी मंदिर (पुणे) येथे सनातनचे भव्य प्रदर्शन !

या प्रदर्शनामध्ये धर्म-अध्यात्म, आचारधर्म, बालसंस्कार आदी धर्मशिक्षणविषयक ग्रंथ उपलब्ध आहेत. तसेच उदबत्ती, कापूर, अत्तर, उटणे, जपमाळ आदी पूजोपयोगी आणि नित्योपयोगी वस्तूही उपलब्ध आहेत.

५१ शक्तीपिठांपैकी एक असलेली श्रीक्षेत्र काशी (उत्तरप्रदेश) येथील श्री बंदीदेवी

श्रीक्षेत्र काशी येथील दशाश्‍वमेध घाटावर श्री बंदीदेवीचे मंदिर आहे. ही देवी ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे.

विश्‍वातील दुसरे सर्वांत मोठे शक्तिपीठ म्हणजे रजरप्पा (झारखंड) येथील श्री छिन्नमस्तिकादेवी !

झारखंडची राजधानी रांची येथून ८० किलोमीटर अंतरावर रामगढ जिल्ह्यात असलेल्या रजरप्पा गावामध्ये श्री छिन्नमस्तिका देवीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील प्राचिन मंदिरांपैकी हे एक असून भैरवी आणि दामोदर या नद्यांच्या संगमावर हे मंदिर वसलेले आहे.

सनातन संस्थेकडून जुन्नर येथील नगर वाचनालयास सनातन-निर्मित ७२ ग्रंथांचा संच भेट

जुन्नर (जिल्हा पुणे) येथील नगर वाचनालयाला सनातन संस्थेकडून सनातनने प्रकाशित केलेल्या ७२ ग्रंथांचा संच भेट देण्यात आला. धर्मशिक्षण, बालसंस्कार, अध्यात्म-धर्म, आयुर्वेद आदी विषयांवरील ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे.

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

येथे हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी १८ सप्टेंबरला संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. ‘मोहरमच्या निमित्ताने दुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी आणून मुसलमानांच्या सणांच्या वेळी हिंदु सणांवर बंदी आणण्याची पद्धत हा धार्मिक पक्षपात आहे’, असे मत सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस यांनी मांडले.

वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन ; सनातन संस्थेचा सहभाग

येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी तहसील चौक, वणी येथे १६ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ईश्‍वराप्रती उत्कट भाव आणि तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ असलेल्या चेन्नई येथील साधिका सौ. उमा रविचंद्रन् सनातनच्या ७० व्या समष्टी संतपदी विराजमान !

श्रीनिवास अवताराचा जन्म झाल्याने पुरट्टासी महिन्याला विशेष मानले जाते. अशा शुभदिनी श्रीकृष्णाप्रती उत्कट भाव असलेल्या चेन्नई येथील सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् यांनी ७१ टक्के पातळी गाठली असून त्या सनातनच्या सुवर्णमय इतिहासात ७० व्या समष्टी संत म्हणून विराजमान झाल्याची आनंददायी घोषणा करण्यात आली.

सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

गुरुदर्शनानंतर अवघे जीवन गुरुचरणी समर्पित करणार्‍या आणि अंतरात कृष्णभक्तीच्या रसात रंगून जात असतांना साधकांनाही कृष्णानंदात डुंबवणार्‍या सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा साधनाप्रवास !

कलियुगापूर्वीच्या युगांतील खरे गुरु, कलियुगातील बहुतांशी भोंदू गुरु आणि गुरुकृपायोगाचे महत्त्व !

सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांत खरे गुरु होते. त्यांच्या वाणीत चैतन्य होते आणि संकल्पात शक्ती होती. त्यामुळे शिष्याने गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जप केल्यावर किंवा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना केल्यावर त्याची प्रगती होत असे.

सनातनच्या आश्रमांत भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोग आचरणात आणला जातो ! – धर्मप्रेमी सौ. स्नेहा अग्रवाल

खोपोली येथील धर्माभिमानी सौ. स्नेहा अग्रवाल आणि त्यांचे पती यांनी देवद आश्रमाला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया येथे देत आहोत.